Petrol-Diesel Price : महाराष्ट्रात 'इतक्या' रुपयांनी महागले पेट्रोल, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol-Diesel Price Today : आज साप्ताहिक सुट्टीच्यानिमित्ताने बाहेर पडण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण कच्चा तेलाच्या किमतीत किरकोळ वाढ झाली असून त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर झाला आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 23, 2023, 10:01 AM IST
Petrol-Diesel Price : महाराष्ट्रात 'इतक्या' रुपयांनी महागले पेट्रोल, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर  title=
Petrol Diesel Price on 23 April 2023

Petrol-Diesel Price on 23 April 2023 : गेल्या काही दिवसापासून पेट्रोल-डिझेलच्या (petrol Diesel price) दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. पाच आठवड्यांनंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाचे किरकोळ दर वाढले होते. परंतु या आठवड्यात पाच टक्क्यांहून अधिक घसरला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अमेरिकेतील बाजारातील भावावर सुस्तीचे वर्चस्व आहे. कमकुवत आर्थिक डेटा आणि व्याजदर वाढीची अपेक्षा यामुळे मंदीची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे तेलाच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात.

महाराष्ट्रात पेट्रोल महागले

दरम्यान तेल विपणन कंपन्यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल केला होता. मे महिन्यात केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. त्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नसला तरी महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमतीत किरकोळ वाढ झाली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Petrol Rate) पेट्रोलचा दर 72 पैशांनी तर डिझेलचा दर 70 पैशांनी वाढला आहे. बिहारमध्ये आज पेट्रोल 49 पैसे तर डिझेल 46 पैसे आहे. पंजाबमध्ये कालच्या तुलनेत पेट्रोल 31 पैशांनी तर डिझेल 30 पैशांनी महागले आहे. तर दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये आणि कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये आहे.

वाचा : राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता, एप्रिल अखेरपर्यंत पावसाचा अंदाज

क्रूड किंमत इतक्या टक्क्यांनी घसरली

या आठवड्यात क्रूडची किंमत 5.1 टक्क्यांनी घसरले. इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (ICE) वर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 81.5 वर बंद झाले. तज्ञांचे म्हणणे आहे की, पुढील आठवड्यात WTI 75 ते 80 डॉलरच्या श्रेणीत राहू शकते. उन्हाळ्यात पेट्रोलची मागणी वाढू शकते, अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे. यासोबतच वर्षाच्या उत्तरार्धात चीनमधील तेलाची मागणीही वाढू शकते. 

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.