Petrol Price Today : महाराष्ट्रात आता तरी स्वस्त होणार का पेट्रोल-डिझेल? पाहा आजचे दर

Petrol-Diesel Price Today: गेल्या वर्षभरापासून पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर अद्याप पेट्रोलचे दर उतरले नाहीत. महाराष्ट्रात आता तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त होतील अशा आशेवर सर्वसामान्य दिसत आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: May 23, 2023, 08:42 AM IST
Petrol Price Today : महाराष्ट्रात आता तरी स्वस्त होणार का पेट्रोल-डिझेल? पाहा आजचे दर title=
petrol diesel price today 23 may 2023 in maharashtra

Petrol Diesel Price on 23 May 2023 : दिवसेंदिवस कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आजही कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलात तेजी पाहायला मिळत आहे. या दरम्यान, WTI कच्च्या तेलाच्या किमतीत 0.61 टक्क्यांनी वाढ होऊन प्रति बॅरल $ 71.99 वर व्यापार करत आहे. तर दुसरीकडे ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत 0.26 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जरी कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाली असली तरी तेल कंपन्यांनी जारी केले पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price) दर जैसे थे आहेत. आजही (23 मे 2023) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील अपडेटेड दर...

आज (23 मे 2023) महाराष्ट्रात पेट्रोलची (Maharashtra Petrol rate) विक्री सरासरी 106.93 रुपयांनी होत आहे. काल, 22 मे 2023 पासून महाराष्ट्रात किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमती सरासरी 106.93 रुपये प्रति लिटरच्या दराने बंद झाल्या, या महिन्यात कोणताही बदल झाला नाही. तर डिझेलची सरासरी 93.55 रुपये दराने विक्री होत आहे. नवीन योजना लागू झाल्यानंतर जून 2017 पासून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात.  

शहर  पेट्रोल (रु.)  डिझेल (रु.)
अहमदनगर  106.36 93.88
अकोला  106.45 92.99
अमरावती  106.90 93.42
औरंगाबाद  106.75 93.24
भंडारा  107.01 93.53
बीड  106.84 94.35
बुलढाणा  106.57 93.11
चंद्रपूर  106.12 92.68
धुळे  106.79 93.30
गडचिरोली  106.92 93.45
गोंदिया  107.85 94.33
बृहन्मुंबई  106.49 94.44
हिंगोली  107.93 93.70
जळगाव  106.34  92.77
जालना  107.84 94.29
कोल्हापूर  106.47 93.09
लातूर  107.83 93.89
मुंबई शहर  106.31 94.27
नागपूर  106.04  93.17
नांदेड  108.03  95.30 
नंदुरबार  107.22 93.71
नाशिक  106.86 92.69
उस्मानाबाद  106.92 93.37
पालघर  106.25 92.26
परभणी  109.33 95.73
पुणे  106.21 93.36
रायगड  106.81 93.27
रत्नागिरी  107.88 94.36
सांगली  106.49 93.02
सातारा  107.18 93.66
सिंधुदुर्ग  107.98 94.46
सोलापूर  106.32 92.85
ठाणे  106.45 94.41
वर्धा  106.23 93.77
वाशिम  106.95 93.47
यवतमाळ  106.49 93.04

SMS द्वारे नवीनतम दर जाणून घ्या

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज  सकाळी 6 वाजता अपडेट होतात. तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर जाणून घेऊ शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर RSP स्पेस पेट्रोल पंप कोड 9224992249 वर एसएमएस करून माहिती मिळवू शकतात आणि BPCL चे ग्राहक RSP 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL चे ग्राहक HPPprice 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.