Petrol Diesel : दोन महिन्यात तब्बल 32 वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

दोन महिन्यात 32 वेळा वाढलं पेट्रोल-डिझेलचे दर   

Updated: Jun 30, 2021, 08:41 AM IST
Petrol Diesel : दोन महिन्यात तब्बल 32 वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ title=

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार येत असल्यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. खास करून जेव्हा पेट्रोलच्या दरात मोठी वाढ होते तेव्हा सामान्यांवर मोठा बोजा पठतो. गेल्या दोन महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात रेकॉर्ड स्तरावर बदल झाले आहेत. (Petrol Diesel Price Today 30 June 2021 : Latest Price Maharashtra Mumbai Fuel Rates ) आज बुधवार 30 जून 2021 रोजी सरकारच्या तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काहीच बदल झालेले नाहीत. मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले होते. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाबद्दल बोलायचं झालं तर मंगळवारी यामध्ये देखील वाढ पाहायला मिळाली. क्रूड ऑयल बेंचमार्क ब्रेंटचा दर 0.68 टक्क्याहून वाढून 75.12 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे. तर WTI क्रूडचा दर 0.69 टक्के वाढ झाली असून 73.48 डॉलर प्रति बॅरल आहे. 

दोन महिन्यात 32 वेळा वाढलं पेट्रोल-डिझेलचे दर 

5 राज्यातील निवडणुकानंतर 4 मे ला पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ व्हायला सुरूवात झाली. या दरम्यान आतापर्यंत तब्बल 32 वेळा पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. यानंतर देशातील अनेक पेट्रोल पंपांवरील इंधनाचा दर रेकॉर्ड ब्रेक आहे. यासोबतच राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 8.41 रुपयांनी तर डिझेलचा दर 8.45 रुपयांनी वाढला आहे. 

शहर

पेट्रोल (रुपये/लीटर)

डिझेल (रुपये/लीटर)

 

नवी दिल्‍ली

98.81

89.18

 

मुंबई

104.90

96.72

 

कोलकाता

98.64

92.03

 

चेन्‍नई

99.80

93.72

 

नोएडा

96.08

89.67

 

बेंगलुरु

102.11

94.54

 

हैदराबाद

 

101.69

97.20

पटना

100.81

94.52

 

जयपुर

105.54

98.29

 

लखनऊ

95.97

89.59

 

चंडीगड                

95.03

88.81

 

गुरुग्राम                

96.52

89.78

 

या शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे

4 मेपासून सतत वाढीनंतर आतापर्यंत अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बनसवारा, इंदूर, जयपूर, भोपाळ, ग्वालियर, गुंटूर, काकीनाडा, चिकमगलूर, शिवमोगा, पाटणा आणि लेहचा समावेश आहे.

आपल्या शहरातील आजची किंमत जाणून घ्या

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. आपल्याला  SMSद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील मिळू शकतात (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर माहिती मिळवू शकतात. त्याचवेळी, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPrice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.