Petrol Diesel Price Today in Mahararashtra : काही राज्यांतील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे, तर काही राज्यांतील नागरिकांसाठी निराशाजनक बातमी समोर येत आहे. कारण काही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. तर काही ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे रविवारी सकाळपासूनच राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवर आहे. कारण राज्यातील पेट्रोल पंप चालक रविवार 10 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 48 तास संपावर जाणार आहेत.
राजस्थान पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सकाळी 6 वाजल्यापासून पुढील 48 तासांसाठी “नो खरेदी, नो सेल” अशी घोषणा केली आहे, असे राजस्थान पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे खजिनदार संदीप बगेरिया यांनी सांगितले. राज्यातील वाढत्या इंधन दरांवरून सरकारला लक्ष्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भाजप सरकार पेट्रोलचे दर कमी करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते, मात्र काहीही झाले नाही. आमच्या व्यापारी संघटनेतील 33% डीलर्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 98.99 पर्यंत वाढली असून ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 97.25 वर पोहोचला आहे. तेलाच्या किंमती अशी असताना दुसरीकडे राजस्थानमध्ये आज पेट्रोल पंपचालकांचा संप आहे. राज्यात आज आणि सोमवार दोन्ही पेट्रोल पंप बंद असणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर