मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामन्यांचं कंबरडं चांगलंच मोडलं आहे. महिन्याभरात 7.1 रुपयाने पेट्रोल तर 7.50 रुपयांनी डिझेल महाग झालं आहे. गेल्या काही दिवसांच्या पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आज ब्रेक लागला आहे. ही पेट्रोल वाढ पुढे देखील सुरू राहू शकते असा अंदाज आहे. सध्या पेट्रोलनं शंभरी पार केली आहे. काही ठिकणी तर पेट्रोल 106 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव घसले तरी पेट्रोल डिझेलचे आजचे दर मात्र स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल कंपन्यांनी आजचे दर स्थिर ठेवले असून सध्या तरी ग्राहकांना कोणताच दिलासा मिळणार नसल्याचं दिसत आहे.
गेल्या काही दिवसांत वाढते पेट्रोल डिझेल आणि त्यामुळे वाढणारी महागाई यामुळे गृहिणींसह सर्वसामान्य नागरिकांचं बजेटही कोलमडलं आहे. 4 मे नंतर 49 दिवसांमध्ये 28 वेळा पेट्रोलच्या किमती वाढल्या.
नवी दिल्लीमध्ये प्रति लिटरमागे 97.50 तर डिझेलसाठी 88.23 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल 103.63 रुपये तर 95.72 प्रति लिटर दर आहे. कोलकातामध्ये 97.38 रुपये लिटरमागे नागरिकांना मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी 91.08 रुपये मोजावे लागणार आहेत. जयपूरमध्ये पेट्रोल 104.17 प्रती लिटर मिळत आहे.
4 मेपासून सतत पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. यामध्ये मुंबई, रत्नागिरी, परभणी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बंसवाडा, इंदौर, जयपुर, भोपाल, ग्वालियर, गुंटुर, ककिनाडा, चिकमंगलुर, शिवमोग्गा आणि लेहचा देखील समावेश आहे.
पेट्रोल-डिझेलचा दर दररोज ठरतो. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर होतात. अगदी घरी मॅसेजवर तुम्ही हे दर जाणून घेऊ शकतात. इंडियन ऑयलचे ग्राहक RSP सोबत शहराचा कोड 9224992249 या नंबरवर पाठवायचा आहे.