मुंबई : तेल कंपन्यांनी गेल्या 8 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमधील वाढ रोखून धरली होती. यानंतर बऱ्याच दिवसांनी कच्चा तेलाच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे इंधनाचा वाढता दर रोखला जाऊ शकतो. (Petrol Diesel Prie Today : 25th Juy 2021 : Fuel Price Petrol Diesel Rate )
रविवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीच बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये प्रती लीटर दर आहे. तर डिझेल 89.87 रुपये प्रती लीटर आहे. गेल्या रविवारी दर स्थिर होते. 17 जुलै रोजी पेट्रोल 30 पैसे प्रति लीटरने वाढलं आहे.
मुंबईत पेट्रोलच्या दराने 29 मे रोजी पहिल्यांदा शंभरी पार केली होती. ईंधनाने हा दर 107.83 रुपये प्रती लीटर आहे. शहरात डिझेलची किंमत 97.45 रुपये आहे. उपनगरात डिझेलची किंमत जास्त आहे. अनेक महानगरात पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्यावर आहे. राजस्थान, ओडिसा आणि मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी 100 रुपये प्रती लीटर दर आहे.
देशातील 17 राज्यात पेट्रोल का भाव 100 रुपये प्रति लीटर किंवा त्याहून अधिक झाले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगना, लडाख, जम्मू कश्मीर, ओडिसा, तमिळनाडु, बिहार, केरळ, पंजाब, सिक्किम, पुड्डुचेरी , दिल्ली आणि पश्चिम बंगाल येथे दर वाढले आहे. भोपाळमध्ये 100 रुपये पेट्रोलचा दर आहे.
देशभरातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल राजस्थानमधील गंगानगर आणि मध्य प्रदेशातील अनुपपूर या ठिकाणी आढळत आहे. गंगानगरमध्ये आज पेट्रोल 113.21 रुपये आणि डिझेल 103.15 रुपये दराने उपलब्ध आहे. तर अनूपपूरमध्ये आज पेट्रोलची किंमत 112.78 रुपये तर डिझेलची किंमत 101.15 रुपये प्रतिलिटर आहे.