नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. इंधनाचे दर सतत वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पेट्रोलचे दर सलग दहाव्या दिवशी देखील वाढतच आहेत. दिल्लीत तर पेट्रोलचे दर 90 रूपयांच्या घरात पोहोचले आहे. आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात 34 पैश्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोलसाठी वाहन चाहकांना 89.88 रूपये मोजावे लागत आहेत. आताच्या घडीला पेट्रोलच्या दरात होत असलेली वाढ सर्वात जास्त आहे.
पेट्रोलसोबतच डिझेलचे दर देखील वाढत आहे. डिझेलने देखील 80 रूपयांचा टप्पा पार केला. आज डिझेल 32 पैशांनी वाढून 80.27 रूपयांवर पोहोचला आहे. इंधनाच्या दरात होणारी वाढ सर्व सामान्यांच्या खिशाला चटका देणारी आहे.
4 मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर
शहर कालचे दर आजचे दर
दिल्ली 89.54 89.88
मुंबई 96.00 96.32
कोलकाता 90.78 91.11
चेन्नई 91.68 91.98
4 मेट्रो शहरांमधील डिझेलचे दर
शहर कालचे दर आजचे दर
दिल्ली 79.95 80.27
मुंबई 86.98 87.32
कोलकाता 83.54 83.86
चेन्नई 85.01 85.31
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMSच्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.
बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.