मुंबई : शेतकऱ्यांना सावकारांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आणि शेतीसाठी स्वस्त दरात कर्ज मिळवून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही एक उत्तम योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. बजेट 2022 मध्ये, सरकार KCC कर्जाची मर्यादा आणखी वाढवू शकते अशी अपेक्षा आहे.
किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढू शकते
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी संसदेच्या पटलावर सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांचा प्रश्न संपूर्ण देशात गाजत आहे. त्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करू शकते. कृषी तज्ज्ञांच्या मते, मोदी सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू शकते. किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरावर (KCC व्याजदर) कर्ज दिले जाते.
किसान क्रेडिट कार्ड कर्जाचा व्याजदर
किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जावर 7 टक्के दराने व्याज मिळते. परंतु, शेतकऱ्याने वर्षभरात कर्जाची परतफेड केल्यास त्याला केवळ 4 टक्के व्याज द्यावे लागेल.
पीक विमाही
शेतकऱ्यांसाठी ही अतिशय चांगली योजना आहे. किसान क्रेडिट कार्डमुळे, शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा देखील काढू शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देखील मिळते. पूर आल्यास, पाण्यात बुडून पीक खराब झाल्यास किंवा दुष्काळ पडल्यास, पीक जळून गेल्यास किसान क्रेडिट कार्ड अत्यंत उपयुक्त आहे.
किसान क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये (KCC कर्ज योजना)
KCC कर्जावर पीक विमा संरक्षण
पहिल्या वर्षासाठी कर्जाची रक्कम शेतीची किंमत, काढणीनंतरचा खर्च आणि जमिनीची किंमत या आधारे ठरवली जाते.
KCC योजनेच्या अटी
क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे