PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, केंद्र सरकारची मोठी घोषणा

PM Kisan Latest Update : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

Updated: Aug 30, 2022, 04:26 PM IST
 PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, केंद्र सरकारची मोठी घोषणा title=

PM Kisan Latest Update : पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Latest Update) लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या 11 वा हफ्त्यासाठी केंद्र सरकाकरडून मोठे बदल करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना 11 वा हफ्ता हवा असेल तर ई केवायसी (ekyc) करावी लागणार आहे. केंद्र सरकारने ईकेवायसी सक्तीचं केलं आहे. मात्र सरकारने केवायसीसाठी मुदतवाढ करण्याबाबत नकार दिलाय. (pm kisan yojana good news for farmers big update on kyc know now new deadline)

केंद्र सरकारची मोठी घोषणा

केंद्र सरकारने या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बंधनकारक  e-KYC साठी मुदतवाढ दिली होती. पीएम किसान पोर्टलवर (pmkisan.gov.in) ही माहिती देण्यात आली होती. पीएम किसान वेबसाइटवरील फ्लॅशनुसार, 'सर्व PMKISAN लाभार्थ्यांसाठी eKYC अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2022 आहे'. यापूर्वी ही मुदत 31 जुलै 2022 होती. अशा परिस्थितीत तुम्ही केवायसी केले नसेल तर आजच करून घ्या.

e-KYC शिवाय हफ्ता नाही

ई-केवायसी नसेल तर लाभार्थ्यांना हफ्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात.आधार आधारित ओटीपी पडताळणीसाठी लाभार्थ्यांना किसान कॉर्नरमधील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करावं लागेल, असं पीएम किसान पोर्टलवर सांगण्यात आलंय. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) केंद्राला भेट द्यावी लागेल. हे काम मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून घरी बसूनही करू शकता.

जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

1. आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी कॉर्नरमधील 'EKYC' पर्यायावर क्लिक करा.

2. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा.

3. लाभार्थी बायोमेट्रिक प्रमाणीकरण हे मोबाइल, लॅपटॉप आणि कॉम्प्यूटरवरुनही करु शकतात. 

4. यासाठी लाभार्थ्यांना सर्वात आधी https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जावं लागेल. 

5. उजव्या बाजूला टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.