नवी दिल्ली : देशात 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पाचही राज्यांमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. भाजपने आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आता नवीन अभियान सुरु केलं आहे.
पीएम मोदींनी केले दान
देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जयंतीनिमित्त भाजपने शनिवारी विशेष दान अभियान (BJP Fund Raising Campaign) सुरु केलेय. या अभियानाचं लक्ष्य आपल्या सदस्यांकडून पक्षासाठी देणगी जमा करण्याचं आहे. या अभियानात पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेकांनी दान केले. तसेच इतरांना ही त्यांनी दान करण्याचं आवाहन केलंय.
दान केल्यानंतर पीएम मोदी (Narendra Modi) यांनी ट्विट करत म्हटलं की, 'मी भारतीय जनता पक्षासाठी एक हजार रुपये दान दिले आहेत. या विशेष अभियानात राष्ट्र प्रथम हे आपलं आदर्श आणि जीवन पर्यंत स्वार्थरहित सेवा करण्याची आपल्या कार्यकर्त्यांची संस्कृतीला आणखी मजबूत करेल. भाजपला मजबूत करण्यासाठी योगदान द्या. राष्ट्र मजबूत करण्यासाठी योगदान द्या.'
पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी ट्विट करत माहिती दिली की, कार्यकर्ते या विशेष अभियानात लाखों लोकांना संपर्क करतील. नमो ऐपच्या माध्यमातून हे डोनेशन जमा केलं जाईल. जगातील सर्वात मोठे राष्ट्रवादी आंदोलन मजबूत करण्यासाठी मी जनतेकडे आशीर्वाद मागतो'
'11 फेब्रुवारीपर्यंत अभियान'
जेपी नड्डा (JP Nadda) यांनी म्हटलं की, हे अभियान 25 डिसेंबर ते 11 फेब्रुवारी पर्यंत सुरु राहिल. या दिवशी पक्षाचे विचारक दीन दयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी आहे.