PM Modi Money Heist Dig At Congress: काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या मालकीच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर आयकर विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये धक्कादायक खुलासा झाले आहेत. 3 राज्यांमधील या छापेमारीदरम्यान 353 कोटींची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवरुन (ट्विटरवरुन) पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन पोस्ट केलेला व्हिडीओ रिशेअर केला आहे.
भाजपाने शेअर केलेला व्हिडीओ कोट करुन रिट्वीट करताना पंतप्रधान मोदींनी, "भारतामध्ये 'मनी हाइस्ट' सारख्या गोष्टींची गजर नाही. कारण आपल्याकडे काँग्रेससारखा पक्ष आहे. या पक्षाचे डाके मागील 70 वर्षांपासून प्रसिद्ध आहेत. अजून डाके समोर येणार आहेत," असा टोला लगावला आहे. धीरज साहू यांच्या वेगवेगळ्या संपत्तीवर टाकेलेली छापेमारी तब्बल 5 दिवस सुरु होती. 6 डिसेंबरला सायंकाळी सुरु झालेली ही छापेमारी 12 डिसेंबर रोजी संपली.
In India, who needs 'Money Heist' fiction, when you have the Congress Party, whose heists are legendary for 70 years and counting! https://t.co/J70MCA5lcG
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2023
5 दिवसांसामध्ये 50 बँक अधिकारी पाच काऊंटिंग मशीनच्या सहाय्याने पैशांची मोजणी करत आहेत. अखेर जप्त केलेल्या या रकमेची मोजणी संपली असून, आकडा 353.5 कोटींवर पोहोचला आहे. झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा येथील ठिकाणांवर आयकर विभागाने धाड टाकली होती. यादरम्यान त्यांना रांची येथे 30 कपा़टांमध्ये ही रोख रक्कम सापडली. दरम्यान, ही कोणत्याही तपास यंत्रणेची सर्वात मोठी कारवाई ठरली असून, जप्त रकमेने मागील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
झारखंडमधून काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्याशी संबंधित रांची आणि इतर ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोख रकमेची मोजणी जवळपास संपली आहे. बालंगीर जिल्ह्यात सर्वात जास्त रक्कम सापडली आहे, जी अंदाजे 305 कोटी आहे. त्यानंतर संबलपूर आणि टिटलागड येथे अनुक्रमे 37.5 कोटी आणि 11 कोटी सापडले आहेत.
झारखंडमधून काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्याशी संबंधित रांची आणि इतर ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोख रकमेची मोजणी संपली आहे. बालंगीर जिल्ह्यात सर्वात जास्त रक्कम सापडली आहे, जी अंदाजे 305 कोटी आहे. त्यानंतर संबलपूर आणि टिटलागड येथे अनुक्रमे 37.5 कोटी आणि 11 कोटी सापडले आहेत. धाडीत सापडलेली रक्कम अधिकारी बालंगीर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा करणार आहेत. दरम्यान याचा रोजच्या कामकाजावर काही परिणाम होणार नाही असं बँकेच्या व्यवस्थापकाने सांगितलं आहे.
धीरज साहू यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं गेल्यास, 2018 मध्ये राज्यसभा निवडणुकीदरम्यान धीरज प्रसाद साहू यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यानुसार त्यांची संपत्ती 34 कोटी सांगितली जात होती. त्यांनी स्वत:वर 2.36 कोटींचं कर्ज असल्याचंही जाहीर केलं होतं. तर आर्थिक वर्ष 2016-17 दरम्यान आयकर परताव्यात 1 कोटी उत्पन्न असल्याचा दावा केला होता.