जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये एका सभेत बोलताना मिशेलच्या अटकेवर देखील वक्तव्य केलं. त्यांनी म्हटलं की, हेलिकॉप्टर घोटाळ्यातील एक राजदार आम्ही पकडून आणला आहे. तो काय बोलेल यामुळे एका संपूर्ण कुटुंबियांना घाम फुटला आहे. याआधी पंतप्रधानांनी राजस्थानच्या सुमेरपूरमध्ये रॅलीला संबोधित केलं. यावेळी भारत माता की जयच्या घोषणेने त्यांनी सुरुवात केली आणि या घोषणेचा काँग्रेसच्या लोकांना त्रास होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
पंतप्रधान मोदींनी म्हटलं काँग्रेसवाले म्हणतात की, राजस्थानमध्ये भाजप नाही टिकणार. हे लोकं दिल्लीच्या एयरकंडिशन रुपमध्ये बसून प्रदुर्षण करत आहेत. जे लोकं 2014 मध्ये मोदीला हरवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण ते निराश झाले. आता ते राजस्थानमध्ये आम्हाला हरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
रॅलीमध्ये मोदींनी काँग्रेस परिवारावर टीका करत म्हटलं की, हे चार पिढीपासून विशेष अधिकार मिळवत आहेत. मी लालदिवा पद्धत बंद केली. ज्यामध्ये काँग्रेसच्या काळात कोटींचा घोटाळा झाला. आई आणि मुलाने जे लिहून दिलं तेच केलं जात होतं. आम्ही आता आधीची प्रकरण बाहेर काढण्यात सुरुवात केली आहे. आता नामदार कोर्टात गेले आहेत. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, भारत सरकारला मागच्या फाईली उघडण्याचा हक्क आहे. आता मी बघतो की किती लोकं वाचतात. आज एक चहावाला त्यांना कोर्टाच्या पायरीवर घेऊन आला आहे. करोडोंचा घोटाळा करुनही हे लोकं जामिनावर सुटतात. जे जामिनावर बाहेर आहेत अशा लोकांच्या हातात तुम्ही राजस्थान सोपवणार का?
पी. चिदंबरम यांच्यावर हल्लाबोल करत मोदींनी म्हटलं की, माजी गृहमंत्री-अर्थमंत्री राहिलेल्या आणि सुप्रीम कोर्टात वकिली करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा देखील आज जेलमध्ये गेला. आज मुलगा जामिनावर बाहेर आहे. आता ते सुद्धा कोर्टात जाऊऩ स्वत:साठी तारीख मागत आहेत.
अगस्ता-वेस्टलँड घोटाळाच्या मुद्दायवर बोलताना मोदींनी म्हटलं की, एका डीलचा राजदार हाती लागला आहे. जो दलालीचं काम करायचा. भारतातील नामदारांच्या मित्रांना तो कटकी द्यायचा. दुबईहून त्याला भारत सरकारने पकडून आणलं आहे. आता हा राजदार जेव्हा राज उघडेल तेव्हा हे प्रकरण आणखी दूरपर्यंत जाईल.
पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, नामदाराच्या नातेवाईकांनी मोफतच्या भावात शेतकऱ्यांची जमीन हडप केली. अशोक गहलोत सरकारमधील सगळेच अधिकारी त्यांच्या सेवेत लागले. या दरम्याने खोट्या कंपन्या बनवून स्टील कंपनींसोबत सौदा करत सरकारकड़ून मदत घेतली गेली. नामदाराच्या नातेवाईकाला 7 पट अधिक पैसे दिले गेले. राजस्थानमध्ये आता सरकार बनली तर यांना शिक्षा मिळणार.