अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या हस्ते अयोध्येत Ayodhya राम मंदिराचं Ram Mandir भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मोदींनी राम मंदिराच्या प्रांगणात पारिजातकाचं रोपटं लावलं. राम मंदिर भूमिपूजनाच्या वेळी लावण्यात आलेल्या या पारिजातकाचं विशेष महत्त्व आहे.
असं बोललं जात की, पारिजातकाचं झाड देवराज इंद्र यांनी स्वर्गात लावलं होतं. या झाडाची फूलं छोटी, पांढऱ्या रंगाची असतात. ही प्राजक्ताची फूलं रात्री फुलतात आणि सकाळी स्वत:च झाडावरुन गळून पडतात. प्राजक्ताचं फूल पश्चिम बंगालचं राजकीय फुल आहे.
या झाडाविषयी अनेक हिंदू मान्यता आहेत. धनाची देवी लक्ष्मी यांना पारिजातकाचं फूल अतिशय प्रिय असल्याचं मानलं जातं. पूजा-पाठ करताना लक्ष्मी देवीला हे फूल वाहिल्याने देवी प्रसन्न होते, असंही बोललं जातं. विशेष बाब म्हणजे पूजा-पाठसाठी प्राजक्ताच्या त्याच फूलांचा वापर केला जातो, जी झाडावरुन गळून पडतात.
पारिजातकाच्या झाडाबाबत असं बोललं जात की, भगवान श्रीकृष्णाने हे झाड पृथ्वीवर आणलं आणि गुजरात Gujarat राज्यातील द्वारका Dwarka येथे लावलं. त्यानंतर अर्जुन द्वारकेतून संपूर्ण पारिजातकाचं झाडचं उचलून घेऊन आले. हे झाडं 10 ते 30 फूटांपर्यंत उंच असतं. हिमालयातील पायथ्याशी मोठ्या संख्येने ही झाडं आढळतात. पारिजातकाची फूलं, पानं आणि खोडाच्या सालीचा उपयोग औषधी म्हणून केला जातो.