PNB 600 Days FD Scheme: देशाच्या सर्वात मोठ्या बँकेपैकी एक पंजाब नॅशनल बँकेने दिवाळीनिमित्ताने आपल्या ग्राहकांना एक आकर्षक ऑफर सुरु केली आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी PNB 600 Days FD Scheme लॉंच केली आहे. या ऑफरद्वारे पीएनबीच्या ग्राहकांना एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉजिटवर तगडा रिटर्न मिळणार आहे. PNB 600 Days FD Scheme नुसार, पीएनबीने आपल्या ग्राहकांसाठी 6.50 टक्क्यांपासून ते 7.30 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून याबद्दलची माहिती ट्विट करुन कळवण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया की, पंजाब नॅशनल बँकेकडून कोणत्या गटातील ग्राहकांना 600 दिवसांच्या एफडीवर किती व्याज मिळत आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या PNB 600 Days FD Scheme अंतर्गत, मुदत ठेवींवर सर्वसामान्यांना 6.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना (60 वर्षांवरील) 7 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना (80 वर्षांपेक्षा जास्त) 7.30 टक्के व्याज दिले जाते. ही ऑफर फक्त 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींसाठी वैध आहे.
Diwali ki khushiyan hui dugni PNB ke saath.#600DaysScheme pic.twitter.com/ESKpRwhaQA
— Punjab National Bank (@pnbindia) October 19, 2022
पंजाब नॅशनल बँकेतील 600 दिवसांच्या एफडीवर मिळणारे व्याज हे कोणत्याही एफडीवरील व्याजापेक्षा जास्त आहे. 601 दिवसांपासून ते 2 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर सर्वसामान्यांना 5.70 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 6.20 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 6.50 टक्के दर मिळत आहे. ऑफरशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता.