भोपाल : मध्य प्रदेशातील गुनामध्ये पोलिसांनी मास्क न घातल्याने एक दीड वर्षाच्या मुलाचं चलान फाडलं. गाईडलान्सनुसार मास्क न घातल्याने मुलावर कारवाई करण्यात आली. मुलासोबत कारमध्ये ड्रायव्हर आणि 6 वर्षाचा भाऊ होता. ड्रायव्हर आणि भावाने मास्क लावला होता. परंतु दीड वर्षाच्या मुलाचा मास्क नाका खाली असल्याने त्याच्यावर चलन फाडण्यात आले. परंतु पोलिसांनी या चलनावर त्याच्या वडीलांचे वय लिहल्याने पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
गुना शहरातील गल्ला मंडीमध्ये राहणाऱे एका परिवारातील 2 मुलं कारमधून ड्रायवरसह घरी जात होते. एका मुलाचे वय 6 वर्षे तर दुसऱ्याचे दीड वर्ष आहे. शहरातील एका चौकात त्यांना पोलिसांनी अडवले. त्यावेळी ड्रायवर आणि 6 वर्षीय मुलाने मास्क लावले होते. दीड वर्षाच्या मुलाने फक्त मास्क अडकवले होते. परंतु ते नाकावर नव्हते.
पोलिसांनी दीड वर्षाच्या मुलावर कारवाई करण्याचे ठरवले. आणि त्याच्या नावे 100 रुपयांची पावती फाडली. या पावतीत मुलाच्या वयाऐवजी वडीलांचे वय नमूद करण्यात आले.
या घटनेनंतर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पोलिसांचे नागरिकांप्रती असलेला व्यवहार चव्हाट्यावर आला आहे. पोलिस अधिक्षक राजीव मिक्षा याप्रकरणी चौकशी करीत आहेत.