PPF Rules: पोस्ट ऑफिससी संबंधित स्मॉल सेव्हिंग स्कीमसंदर्भात अर्थ मंत्रालयांतर्गंत येणाऱ्या आर्थिक प्रकरणांबाबत मोठे बदल केले जाणार आहेत. त्यासाठी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून नॅशनल स्मॉल सेव्हिंग (NSS)च्या योजनांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. याचा उद्देश बचत योजनांतर्गंत उघडण्यात आलेली अनियमित खाते नियमित करणे हा आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वे 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील. नवीन नियमांचे पालन न केल्यास खाते बंद होऊ शकते.
पोस्ट विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, सहा श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. त्यानुसार नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे. 2 एप्रिल 1990 पूर्वी उघडण्यात आलेल्या अकाउंटवर आधीच्या खात्यावर चालू व्याजदराचा फायदा मिळणार आहे. चालू पोस्ट ऑफिस बचत खाते (POSA) दर आणि दुसऱ्या खात्यातील उर्वरित रकमेवर 2% व्याज मिळणार आहे. नवीन नियमांनुसार 1 ऑक्टोबर 2024 पासून दोन्ही खात्यांवर 0 टक्के व्याज मिळणार आहे.
या नियमांतर्गंत चुकीच्या पद्धतीने उघडलेले एनएसएस खाते, मुलांच्या नावाने उघडलेले पीपीएफ खाते, एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते, परदेशी व्यक्तींनी वाढवलेले पीपीएफ खाते आणि मुलांच्या पालकांव्यतिरिक्त आजी-आजोबांनी उघडलेले सुकन्या समृद्धी खाते (SSY) मध्ये दुरुस्ती करणे. नियमांनुसार, दोनपेक्षा जास्त खात्यांवर आणि तिसऱ्या आणि अतिरिक्त खात्यांवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. तसंच, मुळ रक्कम ठेवीदाराला परत केली जाणार आहे.
अल्पवयीन मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर सुरू करण्यात आलेल्या अकाउंटवर अल्पवयीन 18 वर्षांचा होईपर्यंत POSA) पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट व्याज उपलब्ध होणार आहे. त्यानंतर पीपीएफचा दर लागू होणार आहे. तसंच, मॅच्युरिटीचे गणित अल्पवयीन 18 वर्षांच्या झाल्यानंतर लागू होणार आहे. एकापेक्षा अधिक पीपीएफ अकाउंटमध्ये जमा असलेली रक्कम वार्षिक मर्यादेच्या आत असल्यास, योजनेचा प्रभावी दर प्राथमिक खात्यावर लागू होईल. कोणतेही दुय्यम खाते प्राथमिक खात्यात विलीन केले जाईल. रक्कम जास्त असल्यास 0टक्के व्याजासह परत केले जातील.
आजी-आजोबा ( जे कायदेशीर पालक नाहीत) त्यांनी सुरू केलेल्या खात्यातील पालकाचे नाव बदलावे लागणार आहे. मूळ पालक किंवा कायदेशीर पालकाने हे करणे आवश्यक आहे. जर एखाद्या ग्राहकाने योजनेचे नियम तोडले आणि दोनपेक्षा जास्त खाती उघडली तर अतिरिक्त खाते बंद केले जाईल. मुलांच्या नावे सुरू करण्यात आलेली खाते पुन्हा दुरुस्त करण्यात येतील आणि तुम्हाला व्याजदेखील मिळेल. सर्व पोस्ट ऑफिसना खातेदार किंवा पालकांकडून पॅन आणि आधार क्रमांक गोळा करण्यास सांगितले आहे. प्रथम प्रणाली अद्ययावत केल्यानंतर तुम्ही नियमितीकरणासाठी अर्ज करू शकता. सरकारने पोस्ट ऑफिसांना या बदलांबद्दल खातेधारकांना माहिती देण्यास आणि नियमांचे पालन करण्यास मदत करण्यास सांगितले आहे.
राष्ट्रीय बचत योजनेशी संबंधित तीन प्रकारच्या खात्यांसाठी नियम बदलण्यात आले आहेत. यामध्ये एप्रिल 1990 पूर्वी उघडलेल्या दोन खात्यांचा आणि त्यानंतर उघडलेल्या दोनपेक्षा जास्त खात्यांचा समावेश आहे. यामध्ये, पहिल्या प्रकारच्या खात्यांसाठी 0.20 टक्के अतिरिक्त पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज जोडले जाईल. उर्वरित खात्यांवर सामान्य व्याज मिळेल. तिसऱ्या प्रकारच्या खात्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही आणि त्यांची मूळ रक्कम परत केली जाईल.