Indian Railway Recruitment : जर तुम्ही दहावी पास असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आली आहे. जवळपास 2500 पेक्षाही जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होतेय. (jobs for ssc pass)
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये ही भरती होत आहे अप्रेंटिस या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता यासाठीची अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 17 डिसेंबर 2022. अप्रेंटिस या पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. (recruitment in western railway)
त्यामुळे तुम्हीसुद्धा दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुम्ही अजिबात गमावू नका. त्वरित अर्ज भर आणि नोकरी मिळवा.
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला wcr.indianrailways.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर Go To Contacts हा पर्याय निवडून Recruitment Cell हा पर्याय येईल त्यावर क्लिक करा. त्यानंतर 2022-2023 Engagement of Act Apprentices For हा पर्याय निवडा. अप्लायवर क्लिक केल्यानंतर तुमची रजिस्टेशनची प्रोसेस सुरु होईल. तसेच नंतर विचारलेले सर्व कागदपत्र अपलोड करावेत. त्यानंतर दिलेले शुल्क भरल्यावर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. या अर्जाची प्रिंट आऊट स्वत:जवळ ठेवा.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस या पदासाठी 17 डिसेंबर 2022 ही शेवटची तारीख आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरून टाका एक महत्वाची गोष्ट म्हणजे अंतिम तारखे नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे अजिबात उशीर करू नका पर्यंत तुम्ही आर्ज करू शकता. ही शेवटची तारीख असून या नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच या भरतीमध्ये 2571 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
वयाची अट
अप्रेंटिस पदासाठी वयाची अट देण्यात आली आहे. अर्ज करणारा उमेदवाराच वय 15 ते 24 वर्ष असणं बंधनकारक आहे, आणि ही वयोमर्यादा 17 नोव्हेंबर 2022 नुसार ग्राह्य धरली जाणार आहे. आरक्षित प्रवर्गासाठी शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.
निवड प्रकिया?
अर्ज केल्यानंतर दहावी उत्तीर्ण सर्व उमेदवारांचे गुण आणि गुणवत्ता याच्या आधारे जास्त गुण असलेल्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच आयटीआय, NCVT किंवा SCVT मध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
किती शुल्क भरावे लागेल?
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 रुपये शुल्क आकारले जाईल. यात SC,ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
त्यामुळे जर तुम्हाला कामाची गरज आहे आणि दहावी उत्तीर्ण आहेत तर लगेच त्वरा करा आणि नोकरीसाठी अर्ज भरा. (Railway Jobs big recruitment in indian railway ssc pass students can apply apply here )