Shocking News : देशात रोजगाराचा प्रश्न खुप गंभीर बनत चालला आहे. अनेक सुशिक्षित तरूणांच्या (Educated youngster) हाती नोकऱ्याच नाही आहेत. त्यामुळे अनेक तरूण नैराश्यातून आयुष्य संपवत आहेत. अशीच दुदैवी घटना समोर आली आहे. या घटनेत रेल्वेची परीक्षा (Railway Exam) देणाऱ्या एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्याच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
नरसिंहगडचा रहिवासी असलेला शिवेंद्र पटेल हा रेल्वेच्या स्पर्धा परीक्षेची (Railway Exam)तयार करत होता.या परीक्षेसाठी तो घरापासून दूर एका भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्यासोबत परीक्षेची तयारी करणारे त्याचे दोन मित्र गोविंद आणि अमितही खोलीत राहत होते.
शिवेंद्र गेल्या तीन वर्षापासून रेल्वेच्या स्पर्धा परीक्षेची (Railway Exam) तयारी करत होता. त्याच्यासोबत राहणारे त्याचे दोन मित्र गोविंद आणि अमित देखील एनटीपीसी परिक्षेची तयारी करत होते. या एनटीपीसी परिक्षेत (Railway Exam) त्याचे दोनही मित्र पास झाले होते, तर शिवेंद्र मात्र एका मार्काने हुकला होता. त्यामुळे या अपयशाने तो तणावात गेला होता.
शैलेंद्र सोबत राहणाारे दोन मित्र परीक्षेत पास (Railway Exam) झाल्याने त्यांची रेल्वेत नोकरीसाठी निवड झाली होती. त्यामुळे हे दोघेही मित्र रूम सोडून दुसरीकडे राहायला गेले होते. त्यामुळे आता घरात तो एकटाच राहत होता. आधीच रेल्वेच्या परीक्षेत अपयश आले होते, त्यात मित्रांची रेल्वेत निवड झाली होती, आणि तो घरात एकटा राहत असल्याने त्याला नैराश्य आले होते. या नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलंल आहे.
दरम्यान भोपाळमध्ये (Bhopal news) ही घटना घडली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळ गाठून तरूणाचा मृतदेह खाली उतरवला आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही आहे. त्यामुळे तरूणाने नेमकी आत्महत्या का केली आहे? याचे कारण शोधलं जात आहे. तसेच तरूणाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आणि मृत तरूणाच्या मित्रांची चौकशी केली जात आहे.
या प्रकरणात आता तरूणाने आत्महत्या केली आहे की त्याची हत्या झाली आहे. याचा तपास पोलीस करीत आहेत.