Raj Thackeray Exclusive Interview : प्रेषित मोहम्मद यांच्याविषयीच्या केलेल्या वक्तव्याने भाजपने (BJP) प्रवक्त्या नूपुर शर्मांवर (Nupur Sharma case) कारवाई करत त्यांना निलंबित केले होते. सर्वोच्च न्यायालयानेही नुपूर शर्मा यांच्यावर कठोर ताशेरे ओढले होते. देशात सध्या जे काही होतंय त्या केवळ ही महिला जबाबदार आहे. त्यामुळे नुपूर शर्मा यांनी देशाची माफी मागावी, असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं होतं.
नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद जगभरात उमटत होते. कतार, कुवेत, इराण आणि सौदी अरेबिया या देशांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या इस्लामिक देशांच्या संघटनेने देखील या वक्तव्याची निंदा करत संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी संयुक्त राष्ट्राकडे केली होती.
नुपूर शर्मांच्या वक्तव्यावर इंडोनेशिया आणि मलेशियाच्या हॅकर्सनी जगभरातील इतर हॅकर्सना एकत्र येत भारतातील अनेक संकतेस्थळांवर सायबर हल्ला केला होता. ड्रॅगन फोर्स मलेशिया आणि हॅक्टिव्हिस्ट इंडोनेशिया या हॅकर गटांनी सायबर हल्ले सुरू केले आणि जगभरातील मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर हल्ले करण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान,मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये नुपुर शर्मा प्रकरणी भाष्य करत ओवेसींवर सडकून टीका केली आहे.
"नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत जे काही ऐकले होते ते म्हटले. त्याच्यावर सगळ्यांनी माफी मागायला सुरुवात केली. ओवेसी इथे आमच्या देवदेवांबद्दल जाहीर भाषणांमध्ये बोलतात त्यावेळी बाकीचे माफी मागतात का? ज्या देशांनी विरोध केला होता त्यांनी माफी मागितली होती का? ओवेसींकडून चूक झाली. आमच्याकडून असं होणार नाही ते म्हणाले होते का? ओवैसी हिंदू देवतांबद्दल वाटेल ते बोलले आहेत," असे राज ठाकरे म्हणाले.