बाबा दाती महाराजच्या गुरुकुलमधून ६०० मुली गायब, पोलीस घेतायेत शोध

दाती महाराजने मीडिया समोर दावा केलाय की, आश्रमात ७०० मुली राहत आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 17, 2018, 12:47 PM IST
बाबा दाती महाराजच्या गुरुकुलमधून ६०० मुली गायब, पोलीस घेतायेत शोध title=

जयपूर : स्वयंभू बाबा दाती महाराज याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या गुरुकुल आश्रमातून ६०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. केवळ या आश्रमात १०० मुली आहेत. दरम्यान, मीडियासमोर दाती महाराजने दावा केलाय की, आश्रमात ७०० मुली आहेत. दाती महाराज आणि त्याच्या लोकांकडून धोका असल्या कारणाने ६०० मुली आपल्या घरी गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध पोलीस घेत आहेत.

सेविकेवर बलात्कार, गुन्हा दाखल

एका सेविकेवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंभू बाबा दाती महाराज यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आलाय. दिल्ली पोलिसांची एक  टीम त्याच्या राजस्थान येथील एका आश्रमावर दाखल झालेय. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या सेविकेवर बलात्कार झालाय तिचीही दिल्ली पोलिसांनी भेट घेतली. दरम्यान, दाती महाराज पाली येथील आश्रमात सापडला नाही. मात्र, सेविकेने केल्या आरोपांची माहिती घेण्यासाठी या आश्रमाला भेट घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कोण आहे हा बाबा दाती महाराज?

हा बाबा दाती महाराज आधी चहा विकत होता. तो एका चहाच्या टपरीवर काम करत होता. कालांतराने त्याने स्वत:ला महाराज म्हणून संबोधण्यास सुरुवात केली. सामान्य मदन लाल हा काही वर्षात प्रसिद्ध शनिधाम आश्रमचा मालक झाला. मात्र, सेविकेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्यांची माहिती घेण्यास सुरुवात केलेय. या स्वयंभू बाबाने राजस्थान आणि दिल्लीत अनेकवेळा आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडित महिलेने केलाय. यामध्ये बाबाचे दोन सेवकांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे या पीडित महिलेने आरोप केलाय.

बाबाच्या सेवकांकडूनही अत्याचार!

दरम्यान, दिल्ली महिला आयोगाने याची गंभीर दखल घेत या दाती महाराजाला अटक करण्याची मागणी केली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केलेय. त्यामुळे हा बाबा देश सोडून बाहेर जाऊ शकणार नाही. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, एक तपापासून एक महिला शिष्या दाती महाराजाकडे होती.  बलात्कार झाल्यानंतर ती राजस्थानात आपल्या घरी परतली आहे. दिल्ली गुन्हे पोलीस या बाबाविरोधात पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे.