तुरुंगात भाज्यांचे उत्पादन घेणार गुरमित, ८ तास कामाचे एवढे वेतन

८ तास काम करण्याचे त्याला रोज २० रुपये वेतन मिळणार आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 19, 2017, 11:39 PM IST
तुरुंगात भाज्यांचे उत्पादन घेणार गुरमित, ८ तास कामाचे एवढे वेतन title=
चंढीगड : बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेला गुरमित राम रहीमला भाज्यांचे उत्पादन करण्याचे काम देण्यात आले आहे. तसेच झाडांची कापणी करण्याचे कामही त्याला देण्यात आले आहे.  ८ तास काम करण्याचे त्याला रोज २० रुपये वेतन मिळणार आहे. ५० वर्षीय राम रहीम आपल्या दोन शिष्यांच्या बलात्कार प्रकरणी रोहतकच्या सियारिया तुरुंगात शिक्षा देत आहे.
 
राम रहीम हा झाडे आणि वनस्पतींची कापणी आणि वर्गीकरण करण्याचे काम करणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 'त्याने आधीच आपले काम सुरू केले आहे.' तो जे काही भाजीपाल्याचे उत्पादन घेईल त्याचा उपयोग तुरुंगातील मेससाठी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.