नवी दिल्ली: नव्वदीच्या दशकात दूरदर्शनवर लोकप्रियतेचे मापदंड निर्माण करणाऱ्या 'रामायण' मालिकेत 'सुग्रीवा'ची भूमिका साकारणाऱ्या श्याम सुंदर कालानी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. मात्र, ६ एप्रिलला त्यांची प्राणज्योत मालवली.
'रामायण' मालिकेत त्यांनी साकारलेली सुग्रीवाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या निधनानंतर या मालिकेत श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनीही ट्विटरवरून शोक व्यक्त केला. श्याम सुंदर हे एक सज्जन व्यक्ती होते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे अरुण गोविल यांनी म्हटले आहे.
दूरदर्शन के प्रसिद्ध धारावाहिक #रामायण में सुग्रीव का किरदार निभाने वाले श्री श्याम सुंदर कालानी जी कालका हाउसिंग बोर्ड कॉलोनी के निवासी थे। लाॅक डाउन के दौरान गत रविवार को उनका निधन हो गया था। वे लंबे समय से कैंसर से लड़ रहे थे। ॐ शांति #Ramayana pic.twitter.com/dNZqiLIAaA
— Arun Govil (@ArunGovilSpeaks) April 9, 2020
सध्या लॉकडाऊनमुळे दूरदर्शनवर रामायण मालिका पुन्हा प्रसारित केली जात आहे. यामुळे रामायणातील कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. श्याम सुंदर कालानी यांनी रामायण मालिकेपासूनच आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. याशिवाय, त्यांनी हीर-रांझा, छैला बाबू, त्रिमूर्ती या चित्रपटांमध्येही काम केले होते.