Ration Card: जर तुम्ही रेशनकार्ड धारक असाल आणि सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोरोना काळात सरकारने रेशनकार्ड धारकांसाठी मोफत रेशन योजना (Free ration scheme) सुरु केली होती. पण आता सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
2020 मध्ये कोरोना काळात योगी सरकारने (Yogi Government) उत्तरप्रदेशमधल्या गोरगरीब जनतेसाठी मोफत रेशन योजनेची सुरुवात केली होती. पण आता योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत.
सप्टेंबरपर्यंत सुरु रहाणार केंद्राची योजना
केंद्राच्या गरीब कल्याण योजनेअंतर्गत (Pradhanmantri Garib Kalyan Yojana) मिळणारं मोफत रेशनही सप्टेंबरपर्यंत सुरु रहाणार आहे. केंद्राची ही योजना 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सुरु राहणार अशा बातम्या पसरवण्यात आल्या होत्या. पण याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
आता रेशनसाठी मोजावे लागणार पैसे
उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने मोफत रेशन योजना बंद केल्यानंतर रेशनकार्ड धारकांना गहु प्रतिकिलो 2 रुपये तांदूळ 3 रुपये प्रतिकिलो दराने विकत घ्यावे लागणार आहेत. सप्टेंबर महिन्यापासून हा बदल लागू होणार आहे.
योगी सरकारने ही योजना बंद केल्याने जवळपास 15 करोड लोकांवर यांचा प्रभाव होणार आहे. अंत्योदय कार्ड धारकांना 14 रुपये प्रतिकिलो गहु आणि तांदूळ 21 रुपये प्रतिकिलो या दराने मिळणार आहे.