मुंबई : रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब लोकांना सरकारतर्फे जारी अनेक योजनांचा लाभ घेता येतो. रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी सर्वसामान्यांना मोठ्या अडचणी येतात. सरकारने लोकांचा त्रास कमी करण्यासाठी डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत काही प्रयत्न सुरू केले आहेत. ज्यामाध्यमातून तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीन रेशन कार्ड अपडेट करू शकता.
डिजिटल इंडियाने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये रेशन कार्डशी संबधित सेवांसाठी कॉमन सर्विस सेंटर (CSC)चा उपयोग करू शकतात. येथे तुम्हाला रेशन कार्ड नव्हे तर, अनेक सेवांचा लाभ घेता येतो. कॉमन सर्विस सेंटरने इलेक्ट्रॉनिक आणि सार्वजनिक वितरण विभाग मंत्रालयासोबत मिळून योजना तयार केली आहे. त्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. जवळच्या कॉमन सर्विस सेंटरच्या माहितीसाठी पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.
.@CSCegov_, under the @GoI_MeitY has signed a MoU with the @fooddeptgoi to enable ration card services through 3.70 Lakh CSCs across the country. The partnership is expected to benefit over 23.64 crore ration card holders across the country. pic.twitter.com/OIbutQClC3
— Digital India (@_DigitalIndia) September 16, 2021