शॉपिंग करताना होणार भरपूर फायदा, LIC credit card देतेय अशी सुविधा

LIC Credit Card : जर तुम्ही भारतीय जीवन वीमाचे (LIC of India) ग्राहक किंवा पॉसिसीधारक किंवा एजंट असाल तर तुम्ही या क्रेडिटकार्डचा मोफत फायदा घेऊ शकाल. एलआयसी सीएसएलने नुकतेच आयडीबीआय बँकेसोबत रुपे क्रेडिट कार्ड जारी केले आहेत.  

Updated: Aug 12, 2022, 06:47 PM IST
शॉपिंग करताना होणार भरपूर फायदा, LIC credit card देतेय अशी सुविधा title=

मुंबई : जर तुम्हीही भारतीय जीवन वीमाचे (LIC of India) ग्राहक किंवा पॉसिसीधारक किंवा एजंट असाल तर तुम्ही या क्रेडिटकार्डचा मोफत फायदा घेऊ शकाल. एलआयसी सीएसएलने नुकतेच आयडीबीआय बँकेसोबत  Lumine Card आणि Eclat Cards Credit Card  या नावांचे रुपे क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. सध्या हे क्रेडिट कार्ड केवळ एलआयसी एजंट, सदस्य आणि पॉलिसीधारकांसाठीच आहेत. यासोबतच, हे कार्ड सामान्य नागरिकांना देण्याची देखील योजना आहे. याकार्डचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही एलआयसी प्रीमियममध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 2 पटीने रिवॉर्ड पॉइंट दिले जातील. पेट्रोल भरल्यावर फ्यूल सरचार्ज मिळण्याच्या व्यतिरिक्त या कार्डमध्ये अनेक सुविधा आहेत. 

एलआयसी आणि आयडीबीआय बँकने संयुक्तपणे हे दोन क्रेडिट कार्ड लाँच केले आहेत. पहिलं म्हणजे एलआयसी सीएसएल ल्यूमिन प्लेटिनम क्रेडिट कार्ड (LIC CSL Lumin Platinum Credit Card) आणि दूसरा म्हणजे एलआयसी सीएसएल एक्लॅट सिलेक्ट क्रेडिट कार्ड (LIC CSL Eclat Select Credit Card)
 

काय आहेत एलआयसीच्या Lumine आणि Eclat Credit Card चे फायदे? 

1. Lumin आणि Eclat कार्डधारकांना उत्तम क्रेडिट मर्यादा दिली जाते.
2. ल्यूमिन कार्डधारकांनी 100 रुपयांचा खर्च केला तर बक्षिस म्हणून 3 डिलाईट पॉइंट्स मिळतील.
3. एक्लेट क्रेडिट कार्डधारकांनी 100 रुपये खर्च केल्यानंतर 4 डिलाईट पॉइंट मिळतात. 
4. कार्डधारकाने LIC प्रीमियम सोबत भरल्यास रिवॉर्ड पॉइंट्सच्या दुप्पट. म्हणजेच, प्रत्येक 100 रुपयांसाठी सहा ते आठ रिवॉर्ड पॉइंट्स.
5. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवर LIC IDBI CLAT कार्डधारकांना मोफत लाउंज प्रवेश देखील प्रदान केला जातो.
6. जर तुम्ही या कार्ड्सद्वारे 400 रुपये किंवा त्याहून जास्तीचा व्यवहार केल्यास, इंधन अधिभार म्हणून एक टक्के सूट दिली जाते.
7. जर तुम्ही 3000 पेक्षा जास्त व्यवहार करत असाल तर तुम्ही ते सहज हप्त्यांमध्ये म्हणजेच EMI मध्ये रूपांतरित करू शकता.
8. विशेष बाब म्हणजे यामध्ये कोणतेही प्रोसेसिंग फी किंवा फोरक्लोजर चार्ज नाही.
9. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमची रक्कम 3, 6, 9 किंवा 12 महिन्यांच्या EMI मध्ये रूपांतरित करू शकता.
10. अपघात विम्यामध्ये या क्रेडिट कार्डांचाही समावेश होतो. म्हणजेच, कार्डधारकाचा अपघाती किंवा सामान्य मृत्यू झाल्यास, कव्हर, क्रेडिट शिल्ड कव्हर आणि शून्य हरवलेले कार्ड यांसह इतर आकर्षक विमा संरक्षणाचा लाभही नामनिर्देशित व्यक्तीला दिला जातो.
11. तुमच्या कार्डवरील विमा दाव्याच्या 90 दिवस आधी कार्ड व्यवहार झाला असेल तरच हा लाभ मिळेल.
12. हे कार्ड वापरून तुम्हाला वेलकम बोनस पॉइंट्स देखील मिळतात. कार्ड मिळाल्यापासून 60 दिवसांच्या आत तुम्ही रु. 10000 खर्च केल्यास 1000 किंवा 1500 चे वेलकम बोनस डिलाईट पॉइंट्स दिले जातात. ज्या तुम्ही रिडीम करू शकता आणि जीवनशैलीच्या वस्तू खरेदी करू शकता.
13. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यासाठी कोणतीही जॉईनिंग फी किंवा वार्षिक फी नाही.
14. जर तुम्हाला तुमच्या नावाने बनवलेले कार्ड मिळत असेल, तर तुम्हाला भविष्यात आणखी दोन अ‍ॅड-ऑन कार्ड मिळू शकतात.
15. स्वतःसाठी कार्ड तयार केल्यानंतर, तुम्ही त्यात कुटुंबातील इतर सदस्य जोडू शकता. यामध्ये कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही.