मुकेश अंबानी यांची बादशाहत संपली, गौतम अदानी बनले आशियातले सर्वात श्रीमंत व्यक्ती

Richest Person in Asia : देशाताली सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गेला अनेक काळ उद्योगपती मुकेश अंबानी यांची बादशाहत होती. पण आता उद्योगपती गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकलंय. अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

राजीव कासले | Updated: Jan 5, 2024, 02:39 PM IST
मुकेश अंबानी यांची बादशाहत संपली, गौतम अदानी बनले आशियातले सर्वात श्रीमंत व्यक्ती title=

Richest Person in Asia : नविन वर्ष म्हणजे 2024 ची सुरुवात उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी शानदार झाली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची बादशाहत मोडत गौतम अदानी आशियातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. हिडनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिलेल्या निकालानंतर गौतम अदानी यांना मोठा दिलासा मिळाला. ब्लूमबर्ग बिलेनिअर्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत (Richest Person in Asia) गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकल. याबरोबरच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी आता बाराव्या स्थानावर पोहोचले आहेत. 

मुकेश अंबानी यांची एका दिवसातील कमाई
ब्लूमबर्ग बिलेनिअर्सच्या यादीत 99 बिलिअन डॉलरच्या नेटवर्थसह मुकेश अंबाना 13 व्या स्थानावर आहेत. गुरुवारी म्हणजे 4 जानेवारीला अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये 983 मिलिअन डॉलर्सची भर पडली. अंबानी यांच्या एकूण नेटवर्थमध्ये 0.98 टक्के घसरण झाली. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी बाराव्या स्थानावर पोहोचले. आकल एका दिवसात गौतम अदानी यांच्या कमाईत मोठी भर पडली.

गौतम अदानी यांची एका दिवसातील कमाई
ब्लूमबर्ग बिलेनिअर्सच्या यादीत 99.7 डॉलरच्या नेटवर्थसह गौतम अदानी 12 व्या स्थानावर आहेत. काल एका दिवसात त्यांच्या एकूण नेटवर्थमध्ये 7.6 बिलिअन डॉलरची भर पडली. त्यांच्या नेटवर्थमध्ये 4.90 टक्क्यांची वाढ झाली आहे. 61 वर्षांच्या गौतम अदानी यांचं साम्राज्य भारतात इन्फ्रास्ट्रक्टर, कमोडिटी याशिवाय इतर अनेक व्यवसायत पसरल आहे. अदानी समूहाचे ते मालक आहेत. 

सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा परिणाम
हिंडनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने गुरुवारी क्लीन चीट दिली. त्यामुन अदानी समुहाच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहिला मिळाली. त्यामुळे एका दिवसात गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना पिछाडीवर टाकलं. त्यामुळे अदानी आशियाईतील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेत.