नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकांची Bihar Assembly Election results 2020 रणधुमाळी आणि त्याचे पडसाद साऱ्या देशभरात उमटताना दिसले. याच वातावरणाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. निवडणुकांचे निकाल हाती येण्यास काही तासांचा अवधी असला तरीही कल हाती येण्यास सुरुवात झाल्यामुळं समर्थकांची लगबग सुरु झाली आहे.
मंगळवारी निवडणुकांच्या निकालांसाठी मतमोजणी सुरु झाली आणि सुरुवातीपासूनच महागठबंधनला आघाडी मिळताना दिसली. ज्यामुळं राजदचा हा मोठा विजय असणार अशीच खात्री समर्थकांना झाली. या सर्व वातावरणात काही समर्थक हे tejashwi yadav तेजस्वी यादव यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी सोबत शुभशकूनाचं प्रतीक म्हणून मासे आणले होते.
Patna: Supporters of RJD leader Tejashwi Yadav outside his residence as counting of votes for #BiharElection2020 is underway pic.twitter.com/VvJAlZg8uv
— ANI (@ANI) November 10, 2020
बिहारमध्ये मासा शुभसूचक मानला जातो. त्यामुळे आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांना भेट देण्यासाठी मासे आणले आहेत. एका माशाचं नाव तेजस्वी तर दुस-या माशांचं नाव तेज प्रताप यादव ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. आपल्या पक्षाला किंवा नेत्याला पाठिंबा देण्यासाठी किंवा त्याचं समर्थन करण्यासाठी कार्यकर्त्यांचा हा फंडा चर्चेचा विषय ठरत आहे.