Rules change from 1 April 2024 : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर देशात काही अपेक्षित बदल घडून आल्याचं पाहायला मिळालं. केंद्र सरकारकडून इंधनाच्या दरात कपात करण्याचा मोठा निर्णयही घेण्यात आला. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसं केंद्र सरकार अनेक नवी धोरणं राबवत त्या अनुषंगानं काही निर्णयांमध्ये बदल करताना दिसत आहे. त्यातच एप्रिल महिन्यात काही नव्या निर्णयांची भर पडणार आहे.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात काही नियम बदलता आणि त्याचे थेट परिणाम नागरिकांवर होत असतात. येऊ घातलेली निवडणूक पाहता सरकार एखादा प्रभावी निर्णय एप्रिल महिन्यात घेऊ शकते असं म्हटलं जात आहे. नेमके कोणते नियम येत्या काळात बदलू शकतात? पाहा...
Pan Card- Aadhaar Card लिंक
पॅन कार्ड (Pan Card) ला आधार कार्ड (Aadhaar Card) सोबत लिंक करणं अर्थात जोडून घेणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यासाठी (Pan-Aadhaar Link) ची डेडलाईन 31 मार्च 2024 असून, असं न केल्यास तुमचा पॅन क्रमांक बंद होऊ शकतो. 1 एप्रिलनंतर पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये इतकी रक्कम पेनल्टी स्वरुपात भरावी लागणार आहे.
EPFO चा नियम
EPFO कडून एप्रिल महिन्यात नवा नियम लागू करण्यात येणार असून, या नियमानुसार आता पीएफ अकाऊंट ऑटो मेडमध्ये ट्रान्सफर होईल. म्हणजेच अकाऊंट ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट करण्याची गरज नाही. त्यामुळं अनेकांच्याच अडचणी दूर होणार आहेत.
LPG दर
एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात एलपीजी सिलेंडरचे (LPG Cylinder Price) दर बदलले जाऊ शकतात. बहुतांशी निवडणुकांचं वातावरण पाहता हे दर कमीच होऊ शकतात अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवी कर पद्धती
तुम्ही करदाते असाल आणि टॅक्स रिजिम निवडलं नसेल, तर आधी हे काम उरकून घ्या. कारण, 1 एप्रिलपासून नवी करप्रणाली लागू होणार आहे जी सर्वांसाठी सरसकट लागू असेल.
एसबीआय क्रेडिट कार्ड
एसबीआयचं क्रेडिट कार्ड आणि त्यासंदर्भातील नियम 1 एप्रिलपासून बदलणार आहेत. जे क्रेडिट कार्डधारक एसबीआयच्या कार्डच्या माध्यमातून रेंट पेमेंट करतात त्यांना इथून पुढं कोणताही रिवॉर्ड पॉईंट मिळणार नाही. 1 एप्रिलला मान्य होणारा हा नियम 15 एप्रिलपासून लागू असणार आहे.