नवी दिल्ली : पीएनबीच्या 11500 कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर आता आणखी एका बँकेतील घोटाळा समोर आला आहे.
पीएनबीनंतर आता ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने जवळपास 390 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची तक्रार सीबीआयकडे केली आहे. सीबीआयने दिल्लीतील एका ज्वेलरी आउटलेटविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सीबीआयने करोल बाग मधील द्वारका दास सेठ इंटरनॅशनलच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ही कंपनी डायमंड, गोल्ड आणि सिल्वर ज्वेलरीचं मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग करते. या कंपनीने ओबीसीच्या ग्रेटर कैलाश-II मधील ब्रांचमधून 2007 मध्ये फॉरन लेटर ऑफ क्रेडिट मिळाल्यानंतर लोन घेतलं होतं.
या कंपनीचे संचालक सभ्य सेठ आणि रीता सेठ हे आहेत. पंजाबी बागमध्ये हे दोघे राहतात. याशिवाय कृष्ण कुमार सिंह आणि रवी कुमार सिंह हे देखील या कंपनीशी संबंधित आहेत. सीबीआयने एफआयआरमघ्ये यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
बँकेने दावा केला आहे की, सभ्य सेठ आणि कंपनीचे इतर डायरेक्टर्स 10 महिन्यांपासून घरी नाही आहेत. बँकने अशी शक्यता वर्तवली आहे की, सभ्य सेठ देखील नीरव मोदी आणि विजय माल्या यांच्याप्रमाणे भारत सोडून पळून गेले आहेत.
सरकारी क्षेत्रातील बँक ओबीसीने 16 ऑगस्ट, 2017 ला सीबीआयकडे द्वारका दास सेठ इंटरनेशनल विरोधात तक्रार दाखल केली आहे. लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून त्यांनी अनेक क्रेडिट सुविधांचा फायदा घेतला आहे.