Seema sachin Love Story: पाकिस्तानी सीमा हैदर भारतात का आली? तो प्रेमवेडी आगे की गुप्तहेर आहे? हा सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. यूपी एटीएसने दोन दिवस केलेल्या चौकशीत सीमा हैदरने अनेक गुपिते उघड केली आहेत. मात्र, एटीएस किंवा यूपी पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षावर आलेले नाहीत. पण सीमा हैदरच्या बोलण्यातून काहीतरी गडबड गोंधळ असल्याचे जाणवत आहे. सीमा हैदरने लष्कराच्या जवानांसोबतच दिल्ली आणि नोएडामधील अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचे कळते.
चौकशीदरम्यान सीमा हैदरचे सचिनशिवाय अनेक लोकांशी संभाषण झाल्याचे समोर आले आहे. ती दिल्लीजवळ राहणाऱ्या मित्राच्या शोधात होती. तू दिल्लीपासून किती दूर राहतोस? असे सचिनला विचारल्याची कबुली सीमाने दिली. यावर सचिनने दिल्लीपासून आपले घर 40 ते 50 किलोमीटर दूर असल्याचे सांगितले होते. सीमाने भारतातील अनेक शहरांची नावे ऐकली नव्हती पण दिल्ली ही राजधानी आहे आणि ते खूप सुंदर शहर असल्याचे तिला माहिती होते. सीमा दिल्लीजवळ प्रियकर का शोधत होती? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
चौकशीदरम्यान एटीएसला आढळले की सीमा आणि सचिन यांच्यातील बहुतांश संवाद रात्री 11 वाजल्यानंतरच इंटरनेट कॉलिंगवर झाला. सचिनने प्रेमाची बाब कुटुंबीय आणि मित्रांपासून लपवून ठेवली होती. सीमाने सचिनकडून कोणत्याही ठिकाणचा सार्वजनिक फोटो मागितला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिनने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने आणि सीमाने एकमेकांना खूप खाजगी फोटोही पाठवले होते.
एटीएसने सीमा आणि सचिनला वेगवेगळ्या पद्धतीने सुमारे 50 प्रश्न विचारले आहेत. काही प्रश्नांमध्ये दोघांची उत्तरे वेगळी आढळली. त्याचवेळी सीमाच्या मोठ्या मुलीलाही प्रश्न विचारण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाच्या मुलीने चौकशीदरम्यान सांगितले की, आई फोन करायची, पण कुठे जायचे हे तिने सांगितले नाही. 'तुमच्या वडिलांबद्दल कोणी विचारले तर काहीही सांगू नका', असे सीमाने मुलांनाही सांगितले होते. एटीएस आणि आयबी आता तिघांची वेगवेगळी विधाने विचारात घेऊन पुढील तपास करत आहे.
चौकशीनंतर एटीएसने सीमा हैदर आणि तिच्या मुलांना सचिन आणि नेत्रपाल यांच्यासह रबुपुरा येथील त्यांच्या घरी सोडले. ही माहिती मिळताच सीमा आणि सचिन यांना भेटण्यासाठी प्रसारमाध्यमं आणि ग्रामस्थ त्यांच्या घरी पोहोचू लागले. मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत कुटुंबातील कोणीही पुढे आले नाही. सचिनच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे सीमा आणि इतरांना राबुपुरा पोलिस ठाण्यात ठेवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. प्रसारमाध्यमांची गर्दी पाहता सीमा, तिची मुले आणि सचिन यांना वस्तीतच आणखी एका व्यक्तीच्या घरात राहण्याची सोय करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.