मुंबई : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील महाकाल मंदिरात गुरुवारी एक धक्कादायक प्रकार घडला. येथे एक महिला बुरखा घालून बाबा महाकालच्या दर्शनासाठी महाकालेश्वर मंदिरात पोहोचली. महिलेला बुरख्यात पाहिल्याने सगळेच जण हैरान झाले. त्यानंतर पोलिसांनी विचारपूस करुन महिलेला दर्शन करण्यासाठी घेऊन गेले.
विचारपूस करताना या महिलेचे पालक देखील तेथे उपस्थीत होते. त्यावेळी पोलिसांच्या लक्षात आले की, ही बुरखा घातलेली महिला हिंदू आहे आणि तिचे नाव लक्ष्मी आहे.
विशेष म्हणजे ही महिला महाकालेश्वर मंदिरात पोहोचताच तिला बुरख्यात पाहून रांगेतील भाविक आश्चर्यचकित झाले. हे पाहाताच लोकांच्या सुरक्षेसाठी तेथे तैनात असलेले पोलिस कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नजराही तिच्यावर पडल्या.
ज्यानंतर या महिलेला जागीच थांबवले गेले. दरम्यान, ही बाब मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांपर्यंत नेण्यात आली. तेव्हा अधिकाऱ्यांनी महाकालाचे दर्शन घेण्याची या महिलेला परवानगी दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी महिलेसोबत आत गेले आणि पोलिसांच्या उपस्थितीत महिलेनं मंदिरात दर्शन घेतलं.
ही महिला राजस्थानमधील भिलवाडा येथील रहिवासी आहे. तिच्यासोबत तिची आई आणि वडील दालचंदही आले होते. पोलिसांनी दर्शन घेण्यापूर्वी सर्वांची तपासणी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांना दर्शन मिळाले.
मंदिर परिसरात तैनात महाकाल पोलिस स्टेशनचे प्रभारी मुनेंद्र गौतम यांनी सांगितले की, लक्ष्मीची बराच वेळ चौकशी करण्यात आली. तेव्हा ती बुरखा घालण्यामागे आश्चर्यकारक कारण समोर आलं.
या या महिलेला बुरख्याबद्दल विचारले असता ती म्हणाली की, तिला 'जिन्नी'ने बुरखा घालून महाकाल मंदिरात येण्यासाठी सांगितले आहे. मात्र, तिच्या घरच्यांनी यामागचं दुसरंच कारण सांगितलं.
या महिलेचे आई-वडिल म्हणाले की, तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे ती बुरखा घालून आली आहे असं सांगितलं. महाकाल मंदिरात जाण्यासाठी लक्ष्मी अनेक दिवसांपासून बुरखा घालण्याचा आग्रह करत होती. त्यामुळे तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबीयांनी तिला बुरख्यामध्ये मंदिरात आणावे लागले.