हवेत उंचावर अडकला आकाशपाळणा, पत्त्यासारखे खाली कोसळले लोक, श्वास रोखणारा व्हिडिओ

 Shocking Video : अंगावर काटा उभा राहिल असा हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. काही लोक एम्यूजमेंट पार्कमध्ये पाळण्यात बसले होते. तेव्हा अचानक आकाश पाळणा वरती हवेतच उंचावर अडकला. ज्यामध्ये बसलेले लोक अक्षरशः हवेत उलटे लटकत राहिले. तर काही पाळण्यातून खाली पडू लागले. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 7, 2024, 02:03 PM IST
हवेत उंचावर अडकला आकाशपाळणा, पत्त्यासारखे खाली कोसळले लोक, श्वास रोखणारा व्हिडिओ title=

Shocking Viral Video:  जत्रेला गेल्यावर आकाश पाळण्यात बसणे हा प्रत्येकाचा आवडीचा घटक असतो. आताही कोणत्याही एम्युजमेंट पार्कमध्ये गेल्यावर प्रत्येकजणच आकाश पाळण्यात बसणे आवडते. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, आकाश पाळण्यात बसणे हे किती रिस्की आहे. त्यामुळे लोकांचा जीव धोक्यात येतो. 

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काही लोक मनोरंजन पार्कमध्ये आनंदाने डोलत होते, तेव्हा अचानक आकाश पाळणा हवेत अडकला आणि त्यात बसलेल्या लोकांचा मृत्यू झाला. ते उलटे लटकत राहिले. बराच वेळ झाल्यावर अनेक लोक उंचावरून खाली पडू लागले. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, एक स्विंग पूर्णपणे गोलाकार आहे, ज्यावर लोक बसलेले आहेत. हा आकाश पाळणा वरपासून खालपर्यंत वर्तुळाकार गतीने फिरतो, परंतु तो मध्येच हवेत अडकला. स्विंग हवेत अडकल्याने बराच वेळ लोक हवेत उलटे लटकत राहिले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AP K (@_memewala_47)

हवेत उंचावर अडकला पाळणा

व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, स्विंग हवेत सरळ वर पोहोचला आणि जमिनीपासून नव्वद अंशाच्या कोनात अडकला. त्यात प्रवास करणारे सर्व लोक हवेत उलटे लटकले होते. यासोबतच शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये लोक वेगाने फिरणाऱ्या झुल्यावरून अचानक खाली पडू लागतात. हे भीषण दृश्य पाहून कुणालाही धक्का बसू शकतो. आणि पुढे कोणत्याही आकाश पाळण्यात बसण्याची हिंमत होणार नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AP K (@_memewala_47)

आकाश पाळण्यातून खाली पडले लोक 

हवेत अडकलेल्या लोकांचा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा श्वास अडकला होता. या आकाश पाळण्यात उंचावर जाऊन आनंद घेण्यासाठी अनेक लोक बसले होते. मात्र काही वेळात हा पाळणा हवेत अडकला आणि थोड्यावेळाने लोक खाली पडू लागले.