मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने आतापर्यंतचे सर्व रेकोर्ड मोडले आहेत. देशातील 135 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतीने 100 रूपयांचा आकाडा ओलांडला आहे. यंदा पेट्रोलच्या दरांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज पेट्रोलचे दर 26-31 पैश्यांनी वाढले आहेत, तर डिझेलचे दर 26-28 पैश्यांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल 72 डॉलरच्या वर व्यापार करीत आहे. जाणून घ्या चार मेट्रो शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर...
४ मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर
कालचे दर आजचे दर
दिल्ली 95.03 95.31
मुंबई 101.25 101.52
कोलकाता 95.02 95.28
चेन्नई 96.47 96.71
४ मेट्रो शहरांमधील डिझेलचे दर
कालचे दर आजचे दर
दिल्ली 85.95 86.22
मुंबई 93.30 93.58
कोलकाता 88.80 89.07
चेन्नई 90.66 90.92
पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.
बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.