Video Viral | 'मुझे BJP मे जाना हैं'; अख्खा गाव गोळा होईल इतका ओक्साबोक्शी रडला चिमुकला

अखंड भारतातून पायी प्रवास करत राहुल गांधी (Rahul gandhi) यांना असंख्य देशवासियांची साथ मिळत असतानाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सर्वांच्याच नजरा वळवू लागला आहे.   

Updated: Dec 3, 2022, 11:03 AM IST
Video Viral | 'मुझे BJP मे जाना हैं'; अख्खा गाव गोळा होईल इतका ओक्साबोक्शी रडला चिमुकला title=
small kid wants to join bjp cries alot as one of party worker tweeted his viral video

PM Modi BJP : (Democratic india) भारतात गेल्या काही वर्षांमध्ये लोकशाहीचा चेहरामोहरा बदल्याचं सर्वांनीच पाहिलं आणि अनुभवलं आहे. या राष्ट्रात सत्तापालट झाला, नव्या योजना आल्या आणि गेल्या, पक्षांतरं झाली. सध्या नेतेमंडळींचा प्रयत्न सुरु आहे तो म्हणजे एक नवा आणि एकसंध भारत उभा करण्याचा. यासाठी सत्ताधारी आणि विरोधक कसोशीनं प्रयत्न करताना दिसत आहेत. राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' (bharat jodo yatra) याचच एक उदाहरण. अखंड भारतातून पायी प्रवास करत राहुल गांधी (Rahul gandhi) यांना असंख्य देशवासियांची साथ मिळत असतानाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सर्वांच्याच नजरा वळवू लागला आहे. 

काय म्हणावं या बालहट्टाला? 

भाजप कार्यकर्ते अरुण यादव यांनी एक (Viral Video) व्हिडीओ नुकताच ट्विटरवर पोस्ट केला. या पोस्टमध्ये एक लहान मुलगा ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. मुझे बीजेपी में जाना है, असं म्हणताना त्याला हुंदका दाटून येतोय तरी त्याचा हट्ट काही थांबेना. काँग्रेस वगैरे काहीच नको मला फक्त भाजपमध्येच जायचंय हाच पाढा तो चिमुकला दिरवताना दिसत आहे. (Small boy wants to join BJP)

हेसुद्धा वाचा : IIT Placementमध्ये मोडले सर्व रेकॉर्ड; इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांना 4 कोटींच्या नोकरीची ऑफर

हा मुलगा कोण, कुठला याची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही. पण, तरीही त्याच्या या बालहट्टाला पाहून अनेकांच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं आहे. आतापर्यंत त्याचा हा व्हिडीओ अडीच लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला, तर 15 हजारांहून अधिक युजर्सनी तो लाईक केला आहे. 

लहान मुलं हट्ट करतात ते ठिक. पण, त्यांचे सर्वच हट्ट पुरवणं आई- वडिलांना काही जमत नाही. या मुलानं तर इतक्या कमी वयातच थेट राजकारणात उडी घेत भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता त्याचा हा हट्ट दुसरंतिसरं कुणी नव्हे तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच (PM Narendra Modi ) पुरवू शकतात असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.