मुंबई: भारतीय बँकांची कर्जे बुडवून ब्रिटनमध्ये पसार झालेला विजय मल्ल्याला अखेर फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्यात आले. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन केलेल्या मुंबईतील विशेष न्यायालयाने शनिवारी हा निकाल दिला. त्यामुळे विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचा सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. मल्ल्याने आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे आणखी काही वेळ मागितला होता. मात्र, न्यायालयान मल्ल्याची ही विनंती फेटाळून लावली.
मोठे आर्थिक घोटाळे, बँकांची फसवणूक यांसारखे मोठे आर्थिक गुन्हे उघडकीस आल्यास गुन्हेगार परदेशामध्ये पलायन करून तिथे आश्रय घेतात. अशा देशांकडून त्यांचे प्रत्यार्पण होणे, त्यानंतर खटले चालविणे यामध्ये खूप वेळ वाया जातो. त्यामुळे घोटाळेबाजांवर वचक निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा-२०१८ तयार केला होता. या कायद्याअंतर्गत फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून जाहीर झाल्यास गुन्हेगाराच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होतो.
Special PMLA court declares Vijay Mallya a fugitive economic offender. His properties can now be confiscated by the government. pic.twitter.com/KHhzCaR50e
— ANI (@ANI) January 5, 2019
Special PMLA Court refused his application to stay the order to give him some time to appeal. https://t.co/HXbdPCxJgg
— ANI (@ANI) January 5, 2019