मुंबई : तुम्ही अजूनही ITR भरला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ITR न भरलेल्यांना आता इथून पुढे दंड आकारण्यात येणार आहे. आयटीआर फाईल न केलेल्या लोकांना हा दंड भरावा लागणार आहे. 2022-23 आर्थिक वर्षात 31 जुलैपर्यंत जवळपास 5.64 कोटींहून अधिक लोकांनी आयटीआर भरला आहे. रात्री आठ वाजेपर्यंत 54 लाख लोकांनी ITR फाईल केलं आहे.
आयटीआरची तारीख वाढणार असल्याचे कोणतेही संकेत देण्यात आले नव्हते. तसं सरकारकडून जाहीर देखील करण्यात आलं होतं. आता 1 ऑगस्टपासून पुढे आयटीआर फाईल करणाऱ्या लोकांना दंड भरावा लागणार आहे. हा दंड कोणाला किती भरावा लागणार? कोणाला यातून सूट मिळणार याबद्दल जाणून घेऊया.
अंतिम मुदतीनंतर म्हणजेच 1 ऑगस्टनंतर ITR फाईल करणाऱ्यांना दंड आकारला जाणार आहे. अंतिम मुदतीनंतर रिटर्न भरण्यासाठी, 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्ना असणाऱ्यांना 1,000 रुपये ले फी आकारली जाणार आहे.
5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नासाठी लेट फी 5,000 रुपये असेल. ही रक्कम 10,000 रुपयांपर्यंत देखील वाढू शकते. तसंच तुम्ही जर चुकीचा आयटीआर भरला असेल तर तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो.
इनकम टॅक्स तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कलम 234F अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीचे आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त नसेल, तर ITR उशीरा भरण्यात काही फरक नाही. म्हणजेच एखाद्याचं उत्पन्न 2021-22 पर्यंत तुमचे एकूण उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला 31 जुलैनंतर आयकर भरण्यासाठी कोणताही दंड भरावा लागणार नाही. तुमच्या वतीने दाखल करण्यात येणार्या ITR ला शून्य (0) ITR म्हटले जाईल.