मुंबई : चालू आर्थिक वर्षात नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)मध्ये आतापर्यंत 50 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांनी नोंदणी केली आहे. NSE चीफ विक्रम लिमये यांनी रविवारी माहिती दिली.
त्यांनी म्हटले की, हे आकडे मागील आर्थिक वर्षात जोडले गेलेल्या गुंतवणूकदारांच्या 62.5 टक्के आहेत. 2020 - 21 मध्ये बाजारात नोंदणी करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या 80 लाख इतकी होती.
गेल्या काही वर्षात डायरेक्ट रिटेल इन्वेस्टर्सची भागीदारी बाजारात मजबूत झाली आहे. या दरम्यान नवीन गुंतवणूकदरांमध्येही गतीने वृद्धी आणि एकूण मार्केट टर्नओवरमध्ये व्ययक्तिक गुंतवणूकदरांची भागीदारी वाढली आहे.
NSE कडून देशभरात चालवला गेला इन्वेस्टर एजुकेशन प्रोग्राम
लिमये यांनी म्हटले की, NSE ने 6000 हून अधिक शहरांमध्ये इन्वेस्टर एजुकेशन प्रोग्राम चालवला. ज्यामुळे देशातील आर्थिक साक्षरतेत उल्लेखनिय वृद्धी झाली आहे.
भारताचे आर्थिक उदारीकरणाला 30 वर्ष पूर्ण झाल्याचे सांगत लिमये यांनी म्हटले की, 1990 च्या दशकात केलेल्या आर्थिक सुधारणांचे बाजाराच्या विकासात महत्वपूर्ण योगदान आहे. त्यातील एक म्हणजे SEBI ची स्थापना आणि दुसरे स्टॉक एक्सचेंचचे विमुद्रीकरण होय.