वाराणसी : वाराणसी जिल्ह्यातील अमौली गावातील एका तरूणाने धर्मांतर केल्याची बातमी सोशल मीडियावर बुधवारी व्हायरल झाली. त्यानंतर खबरदारी म्हणून पोलीस तातडीने तरूणाच्या गावात पोहोचले. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्या तरुणाशी संपर्क साधून चौकशी केली. त्यानंतर एसपी ग्रामीण अमित वर्मा यांनी सांगितले की, तरूणाने कोणत्याही दबावाखाली येऊन हे पाऊल उचलले नाही, तर त्याने आपल्या प्रेयसी सोबत लग्न करण्यासाठी त्याच्या मर्जीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. त्याच्यावर कोणाचाही दबाव नाही.
परंतु, तो तरुण अजूनही हिंदू धर्माच्या मान्यतेचे अनुसरण करतो. म्हणून त्याने धर्म बदलला असला तरी त्याचे नाव बदलले नाही.
या तरूणाने एमबीए केले आहे आणि तो शहरातील एका रुग्णालयात मॅनेजमेंट पाहातो. रुग्णालयात काम करणाताना काही वर्षांपूर्वी तो एका युवतीच्या प्रेमात पडला.
एसपी ग्रामीण म्हणाले की, या युवकाने चौकशीत सांगितले आहे की, त्या युवकाने मुलीशी लग्न करण्यासाठी त्याच्या इच्छेने इस्लाम स्वीकारला आहे. तो पत्नी आणि मुलीसह शहरात राहत आहे. त्याने गावात आणि त्याच्या नातेवाईकांना स्वत: बद्दलचे सत्य सांगितले नाही. तो आपली ओळख लपवत होता. परंतु त्याने हे स्पष्ट केले की, कोणीही त्याला धर्म बदलण्यास भाग पाडले नाही.
धर्मांतर संबंधित कागदपत्रांवर तरूणांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर चौबेपूर पोलीस स्टेशनचे प्रमुख त्या तरुणाच्या गावी पोहोचले. त्यांचे त्या तरुणीच्य़ा त्याची आई, वहिनी आणि भाऊ यांच्याशी बोलणे झाले. परंतु त्यांनी धर्मांतराच्या घटनेला खोटे असल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलीस अधिकारी त्या तरुणाशी बोलले. सुरुवातीला तो ही अफवा असल्याचे सांगत होता. परंतु नंतर त्याने हे मान्य केले.
चौकशीनंतर पोलीस अधिकाऱ्यांना, व्हायरल कागदपत्रांच्या प्राथमिक तपासणीत समोर आले की, लोकं इस्लाममध्ये उमराह करण्यासाठी सौदी अरेबियात जातात. तेथे फक्त मुस्लिमच जाऊ शकतात. दोन वर्षांपूर्वी युवकांने स्वत:च्या उमरासाठी ही कागदपत्रे तयार केली होती आणि आता अचानक ती कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
सोशल मीडियावर ही कागदपत्रे कोणी व्हायरल केली? पोलीस सध्या याचा शोध घेत आहेत.