नवी दिल्ली : बसपा अध्यक्षा मायावती यांनी अॅट्रोसिटी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदलनाचे समर्थन केलं. काहीजण आंदोलनादरम्यान हिंसा करत आहेत, यांचा निषेध करते, कोणत्या हिंसक कारवायांमध्ये आमचा पक्ष नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आंदोलनादरम्यान हिंसक कृत्य करणाऱ्यांना पाठविल गेलं, त्यामुे अनेकांचा जीव गेला तसेच सार्वजनिक मालमत्तेच नुकसानही झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात आज दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद मिळालाय. मध्यप्रदेशातल्या मुरैना शहरात पोलिसांच्या गोळीबारात एका आंदोलर्त्याचा मृत्यू झालाय.
उत्तर भारतात अनेक शहरांमध्ये जमावावर पोलिसांनी लाठीमार केलाय. दलित संघटनांनी अनेक ठिकाणी उग्र आंदोलनं केली. बिहारची राजधानी पाटण्यात खासदार साधू यादव यांनी मोर्चा काढला. तर रांचीमध्ये झालेल्या आंदोलनात पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. पंजाबच्या लुधियाना शहरात कडेकोट बंदोबस्तात कडकडीत बंद पाळण्यात आला. पंजाब सरकारनं सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
Strict action should be taken against those who spread violence during the protests: BSP Chief Mayawati #BharatBandh pic.twitter.com/8ygHO7BzU9
— ANI UP (@ANINewsUP) 2 April 2018
Anti-social elements were sent to cause violence during the protests resulting in death of some people and damage to public property: BSP Chief Mayawati on protests over SC/ST Act pic.twitter.com/sGhHjAXYEL
— ANI UP (@ANINewsUP) 2 April 2018
तिकडे केरळमध्येही दलित संघटना आणि डाव्या पक्षांनी पुकारलेल्या या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून सामान्य व्यवहार ठप्प आहेत. सर्वोच्च न्यायालयात आज सरकारतर्फे निर्णयाच्या पुनर्विचारासाठी याचिका दाखल करण्यात येणार आहे. पण गेल्या सुनावणीत सरकारच्या वतीनं करण्यात आलेले सगळे युक्तीवाद मागे घेऊन दलित अत्याचारांची स्थिती सरकारनं कोर्टापुढे मांडली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी दिला आहे.
अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात आज दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मध्यप्रदेशातल्या मुरैना शहरात पोलिसांच्या गोळीबारात एका आंदोलनर्त्याचा मृत्यू झाला आहे. उत्तर भारतात अनेक शहरांमध्ये जमावावर पोलिसांनी लाठीमार केला आहे.
I support the protest against the SC/ST Act. I have got to know that some people spread violence during the protests, I strongly condemn it. Our party is not behind the violence during the protests: BSP Chief Mayawati pic.twitter.com/SZ4xrvG13k
— ANI UP (@ANINewsUP) 2 April 2018
दलित संघटनांनी अनेक ठिकाणी उग्र आंदोलनं केली. बिहारची राजधानी पाटण्यात खासदार साधू यादव यांनी मोर्चा काढला. तर रांचीमध्ये झालेल्या आंदोलनात पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. तर पंजाबच्या लुधियाना शहरात कडेकोट बंदोबस्तात कडकडीत बंद पाळण्यात आला. पंजाब सरकारनं सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तिकडे केरळमध्येही दलित संघटना आणि डाव्या पक्षांनी पुकारलेल्या या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून सामान्य व्यवहार ठप्प आहेत.
सर्वोच्च न्यायालयात आज सरकारतर्फे निर्णयाच्या पुनर्विचारासाठी याचिका दाखल करण्यात येणार आहे. पण गेल्या सुनावणीत सरकारच्या वतीनं करण्यात आलेले सगळे युक्तीवाद मागे घेऊन दलित अत्याचारांची स्थिती सरकारनं कोर्टापुढे मांडली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी दिला आहे.