शिक्षिकेसोबत विद्यार्थ्याचे संबंध, दहावीत असताना साखरपुडा झाल्यानंतर... धक्कादायक घटना!

 प्रेम आंधळं असतं असं अनेकवेळा बोललं जातं, काही प्रकरणांमध्ये प्रेमवीर आपलं वय विसरून समोरच्याला आपलं हृदय देऊन बसतात. असच एक प्रकरण समोर आलं आहे. 

Updated: Oct 14, 2022, 08:02 PM IST
शिक्षिकेसोबत विद्यार्थ्याचे संबंध, दहावीत असताना साखरपुडा झाल्यानंतर... धक्कादायक घटना! title=

Crime News : प्रेम आंधळं असतं असं अनेकवेळा बोललं जातं, काही प्रकरणांमध्ये प्रेमवीर आपलं वय विसरून समोरच्याला आपलं हृदय देऊन बसतात. मात्र काही दिवसांवर त्याचे परिणाम किती भयंकर ठरू शकतात याचा थोडासाही विचार ते करत नाहीत. असच एक प्रकरण समोर आलं आहे. एका विद्यार्थ्याने आपलं जीवन संपवलं त्यानंतर तपास केल्यानंतर शिक्षिकेशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याने इतंक मोठं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

नक्की काय आहे प्रकरण?
संबंधित शिक्षिका ही तमिळनाडू राज्याची राजधानी चेन्नईपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबत्तूर येथील सरकारी शाळेत करत होती. शाळेतील एक विद्यार्थी होता त्याच्यासोबत तिचं चागलं जुळायचं. सातवीपासून शिक्षिका विद्यार्थ्यांला शिकवत होती. तो विद्यार्थी 10 वीमध्ये गेल्यावर आपल्या मित्रांना घेऊन तो शिक्षिकेच्या घरीही जायचा. 

काही दिवसांनी शिक्षिकेचा साखरपुडा होतो त्यानंतर तिला विद्यार्थ्यासोबत असलेले संबंध तोडायचे होते. मात्र विद्यार्थ्याला हे संबंध कायम करायचे होते. यामुळे इंटर परीक्षा संपल्यानंतर महिनाभरापूर्वी विद्यार्थ्याने टोकाचा निर्णय घेत आपलं आयुष्य संवपलं. मात्र त्याच्या आईला थोडी कुणकुण होती.

विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये या शिक्षिकेसोबतचे फोटो पाहिले त्यानंतर पोलिसांनी संबधित शिक्षिकेवर कारवाई केली आहे. 17 वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेशी ब्रेकअप झाल्यानंतर आत्महत्या केल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.