नवी दिल्ली : कोलकत्ता येथील पोलीस स्टेशनमध्ये एका सब-इंस्पेक्टरचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी ड्यूटीदरम्यान पोलीस वर्दीमध्ये डान्स करत आहे. डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डान्स करणाऱ्या आणि व्हिडिओ बनवणाऱ्य़ा पोलीसांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.
हा व्हिडिओ आसनसोलच्या हिरापुर पोलीस स्टेशनचा आहे. असिस्टेंट सब इंस्पेक्टर कृष्ण सदन मंडल हे बॉलीवूडच्या ‘टुकुर-टुकुर देखते हो क्या’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडिओत महिला पोलीस या डान्सवर डाळ्या वाजवताना दिसत आहेत.
मंडल यांचे ३० नोव्हेंबरला हीरापुर पुलिस स्टेशनमधून चित्तरंजन पोलीस स्टेशनात ट्रान्सफर झाली होती. हीरापुर पुलिस स्टेशनात त्यांना निरोप देताना शेवटच्या दिवशी इतर सहकाऱ्यांकडून डान्स करण्याचा आग्रह करण्यात आला. त्यांनीही हा आग्रह मोडवला नाही आणि आनंदाने त्याने डान्स केला.
देखें, कोलकाता में पुलिस वाले ने थाने के अंदर किया डांस pic.twitter.com/NHDaMudNCi
— NBT Hindi News (@NavbharatTimes) December 4, 2017
या संपुर्ण प्रकाराबद्दल एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकारांमुळे जनतेच्या नजरेत पोलीसांची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे ड्यूटीवर असताना आपल्याला शिस्तीचे पालन करणे बंधनकारक आहे.