Coconut Simple Trick: भारतीय संस्कृतीत नारळाला (Coconut) खूप महत्त्व आहे. अनेकदा पुजा करताना नारळाचा वापर केला जातो. त्यानंतर घरगुती जेवणात नारळातील खोबऱ्याचा वापर केला जातो. मात्र, अनेकदा नारळातील खोबर काढताना हातांना त्रास होतो. चाकू किंवा इतर धारदार गोष्टीनं त्यातून खोबरं वेगळं काढावं लागतं. मात्र आता काम सोप्प झालंय. (how to separate coconut flesh from its shell)
ओल्या खोबऱ्याचा वापर केल्यानं जेवणाची चव आणखी वाढते, त्यामुळे भाजीला चव देखील येते. ओल्या नारळातून खोबरं बाहेर काढण्याची सोप्पी ट्रिक आता समोर आली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुप्रिया साहू (Supriya Sahu Shares Video) यांनी एक व्हिडीओ शेअऱ केलाय.
सर्वप्रथम नारळाचे दोन भाग करायचे, त्यानंतर नारळाचा एक भाग गॅसवर ठेवायचा. त्यामुळे नारळाच्या शेंड्या जळून जातील आणि कवटी वाचेल. मात्र, गॅसवर ठेवताना काळजी घ्यावी. गॅसवरून लगेचच काढून घ्यावं आणि थोड्या वेळातच थंड पाण्यात ठेवावं. त्यामुळे खोबऱ्याची पकट सैल होते आणि खोबरं लगेच निघतं.
For all tengai தேங்காய் (coconut) lovers here is a cool hack for our much loved coconut chutneys. video- 5.Min.Crafts pic.twitter.com/DGicUSFLSW
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) November 3, 2022
दरम्यान, प्रशासकीय अधिकारी सुप्रिया साहू यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. अरेच्चा, हे तर खुप सोप्पं होतं... असं काही गृहिणी म्हणताना दिसत आहे. त्यामुळे आता या व्हिडीओची एकच चर्चा होताना दिसत आहे.