सुषमा स्वराज यांच्या पगारावर पती स्वराज कौशल म्हणतात...

ट्विटरवर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी एका ट्विटर यूजरची बोलती बंद केली आहे.

Updated: Jul 11, 2017, 08:42 PM IST
सुषमा स्वराज यांच्या पगारावर पती स्वराज कौशल म्हणतात...  title=

नवी दिल्ली : ट्विटरवर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी एका ट्विटर यूजरची बोलती बंद केली आहे. सुषमा स्वराज यांना किती पगार आहे, असं एका यूजरनं स्वराज कौशल यांना विचारलं. या प्रश्नाचं स्वराज कौशल यांनीही मजेदार उत्तर दिलं.

'देखो- मेरी उम्र और मैडम की तनख्वाह नहीं पूछो. यह बहुत ही गलत आदत है, असं स्वराज कौशल म्हणाले आहेत. तसंच 'अरे चंदा लेना हो तो सीधा मांग लो, तनख्वाह क्यों पूछते हो, असा सवालही त्यांनी विचारला.

तसंच सुषमा स्वराज यांनी ब्लॉक केल्याची तक्रार एका यूजरनं स्वराज कौशल यांच्याकडे केल्यावर त्यांनीही या यूजरला ब्लॉक केलं. सर सुषमा स्वराज मैडम ने मुझे ब्लॉक कर दिया है। मुझे नहीं पता कि उन्होंने ऐसे क्यों किया है। उनके बहुत सारे प्रशंसक हैं। थोड़ी मदद करिए सर, अशी तक्रार या यूजरनं केली होती.

यानंतर ‘अजी सुनती हो…..! आपने ब्लॉक किया था ना, मैंने भी कर दिया है।’असं म्हणत स्वराज कौशल यांनीही या यूजरला ब्लॉक केलं.