नवी दिल्ली : महात्मा गांधी यांची हत्या झाली, त्यावेळी असे काही लोक होते की त्यांनी याचा आनंद साजरा केला. आज तेच लोक सत्तेत बसले आहेत, असा हल्लाबोल अभिनेत्री स्वरा भास्कर हिने केला आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्वरा भास्करने आपली भूमिका मांडली आहे. तिच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय.
Is desh mein Mahatma Gandhi jaise mahaan insaan ki hatya hui, us waqt bhi kuch aise log the jo celebrate kar rahe the unki hatya ko, aaj wo satta mein hain, un sabko daal dena chahiye jail mein?, nahin na. Obvioulsy nahi: Actor Swara Bhaskar in an interaction with media in Delhi pic.twitter.com/vZPaeIIWVl
— ANI (@ANI) September 1, 2018
महात्मा गांधींना जेव्हा ठार करण्यात आले तेव्हा सगळा देश शोकसागरात बुडाला होता. तरीही काही लोक असे होते ज्यांनी आनंद व्यक्त करत उत्सव साजरा केला. ते लोक आज सत्तेत आहेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात टाकणार का? तर त्याचे उत्तर नाही, असेच आहे. असे स्वरा भास्करने हिने म्हटले आहे. तिने स्पष्टपणे कोणाचेही नाव घेतले नाही.
#WATCH: Actor Swara Bhaskar in an interaction with media in Delhi says, 'Is desh mein Mahatma Gandhi jaise mahaan insaan ki hatya hui, us waqt bhi kuch aise log the jo celebrate kar rahe the unki hatya ko, aaj wo satta mein hain, un sabko daal dena chahiye jail mein?' pic.twitter.com/06tSMpo0d1
— ANI (@ANI) September 1, 2018
सद्यस्थितीत समाजात काहीही झाले की तुरुंगात टाका, असे म्हटले जाते. रक्तपिपासू समाज होणे ही चांगली बाब नाही, असेही स्वरा हिने म्हटले आहे. भिंद्रनवाले यांनाही काही लोक संत म्हणत त्या सगळ्यांनाही उचलून तुरुंगात टाकणार का? असाही प्रश्न स्वरा भास्करने उपस्थित केला आहे.