अमृतसर : देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज, ३६० फूट उंच उभारण्यात आला, पण हा राष्ट्रध्वज ३ महिन्यापासून दिसत नाही. हा का दिसत नाही, यामागील कारण जाणून घेणे देखील महत्वाचे आहे. हा ध्वज पाकिस्तानातील लाहोरमधूनही दिसतो असा दावा करण्यात आला होता.
मात्र हा ध्वज प्रशासनानेच उतरवून ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र येत्या १५ ऑगस्ट रोजी हा ध्वज पुन्हा फडकताना दिसेल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
वेगवान वाऱ्यामुळे हा ध्वज फाटत होता, म्हणून तो ध्वज उतरवून घेण्यात आला, फाटलेला ध्वज हा देखील राष्ट्रध्वजाचा अपमान असल्याने हा ध्वज उतरवण्यात आला होता.
हा ध्वज ३ वेळेस बदलण्यात आला होता, पण हवेच्या वेगामुळे अडचणी येत असल्याने, ध्वज आता १५ ऑगस्ट रोजी फडकवण्यात येणार आहे.