मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट पुढच्या 2 ते 4 आठवड्यांमध्ये येऊ शकते, असा इशारा राज्याच्या टास्क फोर्सनं दिलाय. टास्क फोर्सची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. दुसऱ्या लाटेनंतर झालेल्या अनलॉकमुळे रस्ते, बाजारांमध्ये होणारी गर्दी बघता तिसरी लाट लवकरच येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आलीये.
तिसऱ्या संभाव्य लाटेबद्दल काही भाकितंही टास्क फोर्सनं वर्तवली आहेत.
त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे या तिसऱ्या लाटेत 18 वर्षांखालील मुलांमधील संसर्गाचं प्रमाण पहिल्या दोन लाटांप्रमाणेच 10 टक्क्यांवर असेल, असा अंदाज टास्क फोर्सनं व्यक्त केलाय. राज्यात 5 लेव्हलमध्ये अनलॉक होतोय. अशा वेळी सर्वांनी गाफील न राहता काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा पश्चात्तापाची वेळ येईल.
तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यभर सिरो सर्वेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे, निर्बंधांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे असल्याचे सांगितलं. इंग्लडसहअन्य इतर काही देशांत पुन्हा विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने निर्बंध लावण्याची वेळ आली आहे याकडेही कृती गटाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावर संभाव्य लाट रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.