देशात जवळपास 50 हून अधिक शहरात 45 डिग्रीहून अधिक तापमान, वातावरणात बदल होण्याचं कारण?

वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होणार का?

Updated: Jul 2, 2021, 06:41 AM IST
देशात जवळपास 50 हून अधिक शहरात 45 डिग्रीहून अधिक तापमान, वातावरणात बदल होण्याचं कारण?  title=

मुंबई : देशात आणखी एक संकट डोकं वर करत आहे. देशातील जवळपास 50 हून अधिक शहरांतील पारा हा 45 डिग्रीहून अधिक आहे. त्याचप्रमाणे दिल्ली एनसीआर (Delhi-NCR) सह उत्तर भारतात अनेक भागात मॉन्सून दाखल व्हायला अजून आठवड्याची उसंत आहे. यामुळे येत्या काही दिवसांत गर्मीपासून उसंत मिळेल की नाही यात शंका आहे. (Temperatures above 45 degrees in more than 50 cities in the country, the reason for the change in the climate cycle?) तसेच देशाच्या ज्या भागात पाऊस पडणं गरजेचं होतं त्याभागातही पावसाने दांडी मारली आहे. 

राजधानी दिल्ली आणि अर्ध्या भारतात जवळपास गरमीचा त्रास होत आहे. गरमीमुळे लोकं बेहाल झाले आहे. पावसाळ्यातही लोकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. दिल्ली (Delhi), राजस्थान (Rajasthan), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), हरियाणा (Hariyana) सह अनेक राज्यात रेकॉर्डब्रेक गरमीला सामोरं जावं लागत आहे. पारा 45 डिग्रीवर पोहोचला आहे. 

सध्या दिल्लीत तापमान 44 डिग्री आहे, तर नोएडामध्ये 44 डिग्री, जम्मूमध्ये  44 डिग्री, चूरू-जैसलमेरमध्ये 45 डिग्री, श्री गंगानगरमध्ये  46 डिग्री आणि लखनौमध्ये 39 अंशांनी सर्वांना घाम फुटला आहे. हवामानशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, मान्सूनच्या उशीरामुळे दिल्ली आणि उत्तर भारतातील काही भागांत जोरदार उष्णता पसरली आहे. पुढील  दिवसांत पावसाळा अपेक्षित नसल्याने पुढील काही दिवस लोकांना 40 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमान सहन करावे लागणार आहे. 27 जून रोजी मान्सून दिल्लीत पोहोचतो आणि 8 जुलैपर्यंत तो देशभर पसरतो. परंतु वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्याची प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढत चालली आहे.