नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या बहुचर्चित २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजचा तपशील बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला. मात्र, यामध्ये गरिबांच्या हातात थेट पैसे पडतील, अशी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे देशातील १३ कोटी गरीब परिवार दारिद्य्राच्या खाईत लोटले जातील, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली.
TDS पासून EPF पर्यंत, वाचा अर्थमंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन जे काही सांगितले त्यामध्ये गरीब, भुकेल्या आणि उद्ध्वस्त झालेल्या स्थलांतरित मजुरांसाठी काहीच नव्हते. हजारो स्थलांतरित मजूर अजूनही आपल्या गावांच्या दिशेने पायपीट करत आहेत. तरीही केंद्र सरकारच्या आर्थिक पॅकेजमध्ये त्यांच्यासाठी काहीच नाही. हा कष्टकऱ्यांच्या जखमेवर निर्दयीपणे फुंकर घालण्याचा प्रकार आहे, असे पी. चिदंबरम यांनी म्हटले.
There is also nothing by way of cash transfer to the bottom half of the population - 13 crore families who have been pushed into destitution: Former Finance Minister and Congress leader P Chidambaram #EconomicPackage https://t.co/IX7PHJKKuT
— ANI (@ANI) May 13, 2020
तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्राच्या आर्थिक पॅकेजमधील १५ महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. यामध्ये लघू, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांसाठी ३ लाख कोटींचे विनातारण हमी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे यामुळे ४५ लाख MSME ला फायदा होईल. तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ७२.२२ लाख कर्मचाऱ्यांच्या ईपीएफसाठी २५०० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. नोकरदारांना याचा मोठा फायदा होईल.