भोपाल : मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी जैन तीर्थक्षेत्र कुंडलपूरसह (Kundalpur) दोन शहरे 'पवित्र क्षेत्र' म्हणून घोषित केली आहेत. या दोन्ही शहरांमध्ये मांस (Meat) आणि दारू (Liquor) विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
मद्य आणि मांस विक्रीवर पूर्ण बंदी असणारी ही दोन शहरे मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यात आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून २८५ किमी अंतरावर असलेल्या दामोह जिल्ह्यात असलेल्या कुंडलपूरमध्ये जैन समाजाच्या पंचकल्याणक उत्सवात सहभागी होताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केलीय.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले की, विद्यासागर महाराज यांच्या इच्छेनुसार राज्य सरकार आगामी एका वर्षात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम (एमबीबीएस) हिंदीमध्ये सुरू करणार आहे.
'आचार्य विद्यासागर महाराज यांच्या प्रेरणेने 'कुंडलपूर' आणि 'बंदकपूर' ही दोन शहरे 'पवित्र क्षेत्र' म्हणून घोषित करत आहे. या शहरांमध्ये 'मांस आणि दारूवर पूर्ण बंदी असेल.' अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.