Old currency will make you rich : काही लोकांना जुन्या नोटांचा संग्रह करायला खूप आवडतो (old currency collection) काहीं जणांकडे फार जुना जुन्या नोटा(OLD CURRENCY) आणि नाणी असतात.
जर तुमच्याकडे सुद्धा अशा जुन्या नोटा किंवा नाणी असतील तर हा तुम्हाला चांगला इन्कम स्रोत आहे. कारण अशा काही जुन्या नोटा आणि नाणी बाजारात मोठ्या प्रमाणात मागणीसाठी उपलब्ध आहेत.
यांच्या बाजारात किमती ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. मध्यंतरी एक नोट पुन्हा चर्चेत आली होती जिची मागणी मोठ्या प्रमाणात आहे आणि या नोटेला बक्कळ किंमत मिळते आहे. ही नोट सुमारे 30 वर्षे जुनी आहे.
या एक रुपयाच्या नोटेचा क्रमांक 786786 असून तिचा प्रीफिक्स 56S आहे. त्यावर तत्कालीन वित्त सचिव एस वेंकिटरमणन (S Venkitaramanan) यांचीही स्वाक्षरी आहे. अशा फॅन्सी नंबरच्या नोटा खरेदी करण्यासाठी अनेकजण तयार झाले.
नाणीसुद्धा तुम्हाला बनवतील लखपती
भारत सरकारने 1957 ते 1963 दरम्यान जारी केलेल्या जुन्या 10 पैशांच्या नाण्यांना सध्या चांगली मागणी आहे. 10 पैशांची ही नाणी भारतीय प्रजासत्ताकात जारी केलेली पहिली नाणी होती. 1957 मध्ये भारताने दशांश प्रणाली लागू केली. तर, काही 10 पैशांच्या नाण्यांवर दशांश चिन्ह होते. मात्र, 1963 नंतर सरकारने ही प्रणाली काढून घेण्याचा निर्णय घेतला आणि नाण्यांमध्ये फक्त पैसे लिहिले गेले.ज्या नाण्यांना मागणी आहे ते 10 पैशांचे नाणे तांबे-निकेल धातूपासून तयार केलेले आहे. या नाण्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे या नाण्याचे वजन सुमारे 5 ग्रॅम आहे
आहेत.तथापि, ज्यांच्याकडे असे क्रमांक आहेत किंवा जुनी नाणी आहेत ते अशा ऑनलाइन वेबसाइटवर खाते तयार करू शकतात आणि किंमत मोजून त्यांच्या नोटांची विक्री करू शकतात. या नोटा आता फॅशनेबल नसल्या तरी त्यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक संकेतस्थळांवर या नोटांचा लिलाव होत असून चांगली रक्कम मिळत आहे.